What if human produce poison like snake venom
काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 1:16 PM1 / 11तुम्ही विचार केलाय का की, मनुष्यही सापासारख विष तयार करू शकतात? कदाचित कुणी केला नसेल. पण हे सत्य आहे. मनुष्याच्या शरीरात एक अशी 'टूल किट' असते. ज्यामुळे मनुष्य विष तयार करू शकतो. हा खुलासा केला आहे जपानच्या वैज्ञानिकांनी. त्यांच्यानुसार, मनुष्यच नाही तर इतरही काही जीव विष निर्माण करू शकतात. फक्त त्यांच्या शरीराचा तो भाग गरजेनुसार विकसित होत असतो. म्हणजे त्या जीवाला विषाची गरज आहे की नाही यानुसार.2 / 11जपानमधील वैज्ञानिक म्हणाले की, मनुष्य त्यांचं नाव जगातला सर्वात विषारी साप रॅटल स्नेक आणि सर्वात विषारी डकबिल म्हणजे प्लॅटीपससोबत आपलं नाव जोडू शकतात. वैज्ञानिकांचं मत आहे की, हे मनुष्यांच्या फ्लेक्सिबल जीन्समुळे झालं आहे. हे जीन्स सलायवरी ग्लॅंड्स म्हणजे लाळ ग्रंथीला विषारी आणि बिनविषारी जीवांनुसार विकसित करतो.3 / 11जपानचे ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये या रिसर्चचे सह-लेखक आणि वैज्ञानिक अग्नीश बरूआ म्हणाले की, अॅनिमल किंगडममध्ये जीन्सच्या प्रभावामुळे लाळ ग्रंथी १०० पेक्षा जास्त वेळा विकसित झाल्या आहेत किंवा गरजेनुसार बदलल्या आहेत.4 / 11बरूआ सांगतात की, मनुष्यही त्याच प्रकारे विष तयार करू शकतो. फक्त जीन्समुळे त्यांच्या लाळ ग्रंथी त्याप्रकारे विकसित व्हायला हव्या. तोंडातील विष हे जंतु साम्राज्यात सामान्य आहे. ते वेगवेगळे जीव जसे की, कोळी, साप इत्यादीमध्ये गरजेनुसार विकसित होतं.5 / 11अग्नीश सांगतात की, स्लो लोरिस प्रायमेट्स म्हणजे माकडांच्या श्रेणीतील एक एकुलता एक जीव आहे ज्याच्या तोंडात विषाच्या ग्रंथी असतात. तज्ज्ञांना हे माहीत आहे की, तोंडातील विष हे लाळ ग्रंथीच्या विकासामुळे तयार होतं. पण आता वैज्ञानिकांनी हा खुलासा केला आहे की, यामागे मॉलीक्यूलर मेकॅनिक्स काम करतं.6 / 11ऑस्ट्रेलियातील क्वींसलॅंड यूनिव्हर्सिटीतील बायोकेमिस्ट आणि विष तज्ज्ञ ब्रायन फ्राय सांगतात की, हा खुलासा फार महत्वपूर्ण आहे. हा एक लॅंडमार्क आहे. अग्नीस बरूआ सांगतात की, विष कधीही कुणाच्याही शरीरात विकसित होऊ शकतं. ते अनेक रासायनिक पदार्थांचं मिश्रण असतं. हा रिसर्च करणारे दुसरे तज्ज्ञ अलेक्झांडर मिखेयेवव सांगतात की, मनुष्यासहीत अनेक जीवांमधये एक हाउसकिपिंग जीन्स असतो जो शरीराच्या आत विषारी पदार्थ तयार करतो. पण ते विष नसतं. 7 / 11मनुष्यही सापांप्रमाणे विष तयार करू शकतात हे सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकांनी तायवान हाबू नावाच्या भुरक्या रंगाच्या पिट वायपरचा अभ्यास केला. कारण हा साप ओकिनावामध्ये सहज आढळतो. अग्नीन म्हणाले की, आम्ही हा अभ्यास केला की कोणता जीन विष तयार करण्यासाठी गरजेचा असतो. हा किती जीवांमध्ये सामान्यपणे आढळतो.8 / 11अग्नीश आणि त्यांच्या टीमला असे अनेक जीन्स मिळाले जे विष तयार करण्यासाठी गरजेचे असतात. हे विष शरीरात असलेल्या वेगवेगळ्या टिश्यूमध्ये तयार होतं. या टिश्यूमधून निघणाऱ्या रसायनांना अमीनोट्स म्हणतात. यातील अनेक जीन्स असे असतात जे फोल्डींग प्रोटीन बनवतात. या फोल्डींग प्रोटीनमधूनच मोठ्या प्रमाणात विषारी रसायन निघतात. हे रसायन प्रोटीन असतात.9 / 11आश्चर्याची बाब म्हणजे असे अनेक हाउसकिपिंग जीन्स मनुष्याच्या लाळ ग्रंथीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. जे मोठ्या प्रमाणात स्टिव प्रोटीन निर्माण करतात. या प्रोटीनचं जेनेटिक निर्माण हे स्पष्ट सांगतं की, असे जीन्स जगातील अनेक जीवांमध्ये आढळतात. जे त्यांच्या शरीरात विष तयार करतात. पण त्यांच्यात विषारीपणा नसतो.10 / 11मनुष्याच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या थूंकीत एक विशेष प्रकारचं प्रोटीन आहे. ज्याला कॅलीक्रेन्स म्हणतात. हे असे प्रोटीन्स असतात जे इतर प्रोटीनला पचवण्याचं काम करतात. कॅलीक्रेन्स स्थायी प्रोटीन असतं. जे सहजपणे म्यूटेट होत नाही. साप आणि इतर विषारी जीवांमध्ये हेच प्रोटीन म्यूटेट होतं. जे अत्याधिक वेदनादायी आणि घातक विष तयार करण्याचं सिस्टीम विकसित करतं.11 / 11ब्रायन फ्राय सांगतात की, केलीक्रेन्स जगातील सर्वच विषारी जीवांच्या विषात कोणत्या ना कोणत्या रूपात मिळतं. हे एक फार संक्रिय इंजाइम असतं. हेच प्रोटीन आहे जे मनुष्यात सापासारखं विष निर्माण करण्याची क्षमता ठेवतं. पण हे सहजपणे मनुष्यात विकसित होणार नाही. कारण निसर्ग विष अशा जीवांना देतं ज्यांना आपली शिकार होऊ द्यायची नसते. किंवा त्यांना आपली रक्षा करायची असते. विष कशाप्रकारचं असेल हे जीवावर अवलंबून असेल. म्हणजे तो जीव कसा विकसित झाला यावर. जसे की, वाळवंटात असणाऱ्या वेगवेगळ्या सापांचं विष वेगळं असतं. पण त्यांची प्रजाती एकच असते. आणखी वाचा Subscribe to Notifications