कशापासून बनवला जातो कॅप्सूलचा बाहेरचा भाग? अनेकांना वाटतं ते प्लास्टिक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 12:29 PM
1 / 9 Outer layer of the capsule made of: क्वचितच कुणी असं असेल ज्यांनी औषधात वेगवेगळ्या रंगाच्या कॅप्यूस खाल्ल्या नसतील. गोल आकाराच्या नेहमीच टॅबलेटपेक्षा कॅप्सूल वेगळ्या असता त्या Spherocylinder आकाराच्या असतात. यांचं बाहेरील आवरण प्लास्टिकसारखं दिसतं आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की, प्लास्टिक पोटात जातंय. पण हे सत्य नाहीये. चला जाणून घेऊ कॅप्सूलचं बाहेरचं आवरण खरंच प्लास्टिकचं असतं का, ते तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. 2 / 9 कॅप्सूल हे औषध नसतं. कॅप्सूलच्या आत औषध असतं. जे छोटे छोटे दाने किंवा पावडरच्या रूपात असतं. टॅबलेट चवीला कडू असते, पण कॅप्सूल लहान मुलेही सहजपणे गिळतात. 3 / 9 कॅप्सूल खाणाऱ्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, कॅप्सूलचा बाहेरचा भाग कशाने तयार केला जातो? बऱ्याच लोकांना कॅप्सूलचा बाहेरचा भाग हा प्लास्टिकचा वाटतो. पण हे असं नाहीये. 4 / 9 कॅप्सूलचं बाहेरचं आवरण हे प्लास्टिक नाही तर Gelatin आणि नॉनजिलेटिन शेल्सपासून तयार केलं जातं. जिलेटिन एक पारदर्शी, रंगहीन आणि टेस्ट नसलेला पदार्थ असतो. जो सामान्यपणे प्राण्यांच्या शरीरातील अवयवातून घेतलेल्या कोलेजनपासून मिळवलं जातं. कॅप्सूल पोटात जाताच कॅप्सूलचा बाहेरचा भाग पचनतंत्रात तुटतो आणि औषध शरीराकडून शोषलं जातं. 5 / 9 Medlineplus नुसार, जिलेटीन एक प्रोटिन असतं, जो सामान्यपणे प्राण्यांच्या शरीरातील अवयवातून घेतलेल्या कोलेजनपासून मिळवलं जातं. जिलेटीनचा वापर कॅप्सूल तयार करण्यासोबतच जेवणात, ऑइंटमेंट आणि कॉस्मेटिक तयार करण्यासाठी केला जातो. 6 / 9 सॉफ्ट कॅप्सूल - जर तुम्ही फिश ऑइलची कॅप्सूल बघितली असेल, तर तुम्हाला माहीत असेल की, ही कॅप्सूल सॉफ्ट असते. जी दाबल्यावर दबते. यांना Soft Gel Capsules म्हणतात. सॉफ्ट जेल कॅप्सूल सामान्यपणे एक जिलेटीन आधारित शेल असते, ज्याच्या आत तरल पदार्थ असतो. जे नेहमीच व्हिटॅमिनच्या डोजसाठी वापरल्या जातात. 7 / 9 हार्ड जिलेटीन कॅप्सूल - हार्ड जिलेटीन कॅप्सूल ही लोकांना कन्फ्यूज करते की, ते प्लास्टिक खात आहेत. ही कॅप्सूल थोडी हार्ड असते. यात पावडर आणि बारिक दाने असतात. 8 / 9 व्हेज कॅप्सूल - ही कॅप्सूल शाकाहारी लोकांना समोर ठेवून तयार केली जाते. शाकाहारी कॅप्सूल सेल्युलोजपासून तयार केली जाते. जे झाडांमधील एक महत्वाचं तत्व असतं. 9 / 9 जिलेटीन कॅप्सूलचा शाकाहारी कॅप्सूलच्या तुलनेत अधिक व्यापक रूपाने वापर केला जातो. कारण हे तयार करण्यात पैसे कमी लागतात. आणखी वाचा