शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता राव, चक्क उंदीर मामासाठी बनवलंय गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 2:50 PM

1 / 7
पाळीव प्राण्यांसाठी आपण घर बनविताना पाहिलंय, गायी-म्हशी-शेळी-कोंबड्या यांसाठी घर बनवलं जात. कुत्र्यांसाठीही घर असतं, पण चक्क उंदीर मामासाठी एका अवलियाने चक्क गावच बनवलंय.
2 / 7
ब्रिटनचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सायमन डेल यांनी आपल्या बगीचेत चक्क उंदरांसाठी एक वेगळंच गाव बनवलं आहे. उंदीर मामांसाठी बनविण्यात आलेलं हे गाव अतिशय सुंदर आहे.
3 / 7
या गावात उंदरांसाठी वेगवेगळी घरेही बनविण्यात आली आहे. लाकूड, फूल आणि दगडांच्या सहाय्याने ही घरे बनविण्यात आली आहेत.
4 / 7
विशेष म्हणजे उंदीरमामांसाठी खास सुविधांचीही सोय येथे केली आहे. टेबल, खुर्ची, बैठकव्यवस्था, जेवण आणि पाणी यासह आरामदायी गवतांचे जाळेही अंथरले आहे.
5 / 7
उंदरांसाठी डायनिंग टेबल अन् त्यावर मेजवानी म्हणून उत्तम पदार्थ ठेवण्यात आले आहेत. तर ड्रिंक्सही उपलब्ध आहे.
6 / 7
उंदरांच्या या घरांवर गवत आणि हिरवळ टाकण्यात आली आहे. त्यावर लहान-सहान भांडीही ठेवण्यात आली आहे.
7 / 7
एकदा बगीचेत सफाई करताना मोठ्या प्रमाणात उंदीर आढळल्याने मी उंदरांसाठी घरं बनवल्याच सायमन यांनी म्हटलंय. डेल यांनी आपल्या घरात एक उंदीर पाळला असून त्याचे नाव जॉर्ज असे ठेवले आहे. तर जॉर्जला पत्नी आणि मुले झाल्यानंतर डेलने या बगिचेत अनेक घरे बांधली.
टॅग्स :Homeघरforestजंगल