What is Yarsagumba? Its Uses, benefits and Price per kg api
लैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किंमतीत विकली जाते! By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 3:53 PM1 / 10हिमालय हा केवळ उंचच उंच डोंगर आणि बर्फासाठीच नाही तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. हिमालयातील अनेक जडीबुटी प्रसिद्ध आहे. त्यातील एक खास आहे. या जडीबुटीला हिमालयन वायग्रा असं म्हटलं जातं. ही जडीबुटी ताकदसहीत वेगवेगळ्या उपचारांसाठी वापरली जाते. आणि ही औषधी कमालीची महागडी आहे. 2 / 10हिमालयन वायग्राचं वैज्ञानिक नाव कोर्डिसेप्स सायनेसिस(Caterpillar fungus) आहे. याला कीडा जडी, यार्सागुम्बा किंवा यारसागम्बू या नावानेही ओळखलं जातं. ही औषधी हिमालयाच्या तीन ते पाच हजार मीटर उंचीच्या बर्फाच्या डोंगरावर आढळून येते.3 / 10हिमालय वायग्रा हा चीनमध्ये फार प्रसिद्ध आहे. चीनमध्ये याला यार्सागुम्बा आणि यारसागम्बू नावाने ओळखलं जातं. निर्वासित तिबेटचे लोकही याचा व्यापार करतात. तिबेट आणि चीन दोन्ही ठिकाणी याचा वापर कामोत्तेजना म्हणजे लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो.4 / 10हिमालय वायग्रा जडीबुटीच्या रूपात मध्य प्रदेशातील काही परिसरांमध्ये वापरली जाते. असं सांगितलं जातं की, ही औषधी रोगप्रतिाकारकशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. असे मानले जाते की, श्वास आणि किडनीशी संबंधित समस्यांमध्येही याचा वापर औषधी म्हणून केला जातो.5 / 10हिमालय वायग्राचं नाव यार्सागुम्बा एका कीटकाच्या नावावरून पडलं. या नावाची अळी नेपाळमध्ये आढळून येते. भुरक्या रंगाची ही अळी जवळपास 2 इंच लांब असते.6 / 10यार्सागुम्बा अळी नेपाळमध्ये उगवणाऱ्या काही खास झाडांवरच असते. हिवाळ्यात ही अळी झाडांमधून निघणाऱ्या रसासोबत जन्माला येते. या अळीचं आयुष्य केवळ सहा महिने सांगितलं जातं.7 / 10यार्सागुम्बा अळी मे-जूनमध्ये जीवनचक्र पूर्ण करून मरतात. मेल्यानंतर या अळ्या झाडा-झुडपांमध्ये पसरतात. याच मृत यार्सागुम्बा अळ्यांचा वापर आयुर्वेदात केला जातो. या अळ्यांची टेस्ट गोड असल्याचं सांगितलं जातं.8 / 10हिमालय वायग्रा जडीबुटीवर भारतात बंदी आहे. नेपाळमध्येही 2001 पर्यंत यावर बंदी होती. पण नंतर ही बंदी नेपाळ सरकारने हटवली. आता इथे यार्सागुम्बाचं उप्तादन घेणारी एक सोसायटी आहे. तेच लोक हे विकतात.9 / 10 नेपाळमध्ये मे-जूनमध्ये यार्सागुम्बा जमा करण्यासाठी स्थानिकांमध्ये मोठी स्पर्धा असते. अनेक दिवस लोक डोंगरांवरच टेन्ट लावून राहतात. या जडीबुटीत लैंगिक क्षमता वाढवण्याची क्षमता असल्याने चीनसहीत इतरही देशात याला चांगली मागणी आहे. हजारो वर्षांपासून या जडीबुटीचा वापर केला जातो आहे.10 / 10हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, यार्सागुम्बापासून तयार जडीबुटी नवी दिल्ली आणि नेपाळचे व्यापारी 10 लाख रूपये प्रति किलो दराने खरेदी करतात. तर उत्तराखंड फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे 50 हजार रूपये प्रति किलो दराने खरेदी करतं. ज्यातील 5 टक्के ते रॉयल्टीच्या रूपात ठेवतात. आणखी वाचा Subscribe to Notifications