Which country's national bird is hen? know the answer
कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? अनेकांना माहीत नसेल याचं उत्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 4:11 PM1 / 6सामान्य ज्ञान हे आपल्या एकंदर विकासासाठी, एखाद्या परीक्षेत पास होण्यासाठी किंवा नोकरीच्या एखाद्या मुलाखतीसाठी किती महत्वाचं असतं. वेगवेगळ्या नोकरींच्या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान फार महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. 2 / 6जनरल नॉलेजने आपलं ज्ञान वाढवण्यास मदत मिळते. आपल्याला देशातील-परदेशातील माहिती मिळते. अशात वेगवेगळी माहिती असल्याने मित्र परीवारातही सन्मान वाढतो.3 / 6तुम्हाला हे माहीत आहेच की, प्रत्येक देश त्यांचा एक राष्ट्रीय पक्षी, एक राष्ट्रीय प्राणी निवडतात. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पण तुम्हाला क्वचितच कुणाला माहीत असेल की, कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. 4 / 6याचच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. याचं उत्तर आहे आपला शेजारी देश श्रीलंका. येथील राष्ट्रीय पक्षी श्रीलंकाई जंगल फाउल म्हणजे जंगली कोंबडा आहे.5 / 6आधी याला सीलोन जंगलफाउल म्हटलं जात होतं. हा पक्षी केवळ श्रीलंकेच्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये आढळतो. हा पक्षी कोंबड्याची एक प्रजाती आहे. जंगली कोंबडे हे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असतात. या जंगली कोंबड्यांची लांबी जवळपास ३५ सेमी आणि वजन ५१० ते ६४५ ग्रॅम असतं. 6 / 6तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, श्रीलंकेसोबतच यूरोपीयन देश फ्रान्सचा देखील राष्ट्रीय पक्षी कोंबडा आहे. इथे गॅलिक रूस्टर म्हणजे एक प्रकारच्या जंगली कोंबड्याला राष्ट्रीय पक्षी बनवलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications