शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोण आहे ताजमहालवर मालकी हक्क सांगणारी आणि स्वत:ला रामाचा वंशज मानणारी राजकुमारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:36 PM

1 / 10
Who is Diya Kumari: राजकुमारी दीया कुमारी हे नाव तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच. त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेत होती. कधी त्या ताजमहाल त्यांची संपत्ती असल्याचं म्हणतात तर कधी त्या स्वत:ला भगवान राम यांच्या वंशज सांगतात. पण प्रत्यक्षात राजकुमारी दीया कुमारी कोण आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? हे आम्ही सांगणार आहोत.
2 / 10
दीया कुमारी जयपुरचे शेवटचे शासक महाराजा मान सिंह द्वितीय यांची नात आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1971 ला जयपुर राजस्थानमध्ये एक प्रतिष्ठित भारतीय सेना अधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांच्या घरात झाला होता. भवानी सिंह यांना मुलगा नव्हता. त्यामुळे दीया कुमारी यांच्या मुलालाच 2011 मध्ये त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं.
3 / 10
दीया कुमारी यांचं सुरूवातीचं शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून झालं. नंतर मुंबईच्या जीडी सोमानी मेमोरिअल स्कूल आणि शेवटी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूलमधून झालं. त्यांनी ऑर्टमधून डिप्‍लोमा डिग्री मिळवली आहे.
4 / 10
दीया कुमारी यांनी 1997 मध्ये नरेंद्र सिंह यांच्यासोबत लग्न केलं होतं. नरेंद्र सिंह यांचा राजघराण्याशी काही संबंध नव्हता. त्यामुळे राजकुमारीने अशा व्यक्तीसोबत लग्न करणं चर्चेचा विषय ठरलं होतं. पण नंतर 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
5 / 10
दोघांना दोन मुले पद्मनाभ आणि लक्ष्यराज सिंह व एक मुलगी गौरवी सुद्धा आहे. दीया यांचे वडील भवानी सिंह यांचं निधन 2011 मध्ये झालं होतं. नंतर गादीचा वारस म्हणून पद्मनाभ सिंह याला ठरवण्यात आलं.
6 / 10
दीया कुमार आपली आजी राजमाता गायत्री देवी यांच्या पावलावर पाउल देत राजकारणात आल्या. 10 सप्टेंबर 2013 ला त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्या निवडून आल्या. 2019 मध्ये त्या राज्यसभा सदस्य झाल्या.
7 / 10
आपल्या वक्तव्यावरून त्या नेहमीच चर्चेत असतात. 2019 मध्ये त्यांनी त्या भगवान रामाच्या वंशज असल्याचं म्हटलं होतं. याबाबत त्यांनी ट्विटही केलं होतं.
8 / 10
इतकंच नाही तर दीया कुमारी यांनी ताजमहालावरही मालकी हक्क सांगितलं होता. त्या म्हणाल्या होत्या की, ताजमहाल त्यांच्या परिवाराचा महाल होता. ज्याची कागदपत्रे अजूनही त्यांच्याकडे आहेत. राजकुमारी दीया कुमारी म्हणाल्या होत्या की, ताजमहाल जयपुरच्या राजघराण्याचा महाल होता. ज्यावर शहांजहाने ताबा मिळवला होता.
9 / 10
रिपोर्ट्सनुसार, महाराजा पद्मनाभ सिंह सध्या 23 वर्षाचे आहेत आणि त्यांच्याकडे 697 मिलियन डॉलर ते 855 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, या शाही परिवाराकडे एकूण 2.8 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
10 / 10
या राजघराण्याकडे एक शानदार हवेली आणि फाईव्ह स्टार हॉटेलही आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या लक्झरी कारही आहेत. त्याशिवाय राजकुमारी यांच्या अनेक मूल्यवान वस्तू आहेत. ज्यांच्या किंमतीचा अंदाज लावणं अवघड आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके