शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एसी भींतीवर वरच्या बाजूलाच का लावला जातो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 5:26 PM

1 / 5
उन्हाळ्यात एसीची रूम फारच आरामदायक ठरते. याने बाहेरच्या भीषण उन्हापासून बचाव होतोच, सोबतच शरीराचं तापमानाही जास्त होऊ देत नाही. एसी उन्हाळ्यात किती फायदेशीर ठरतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण एसी भींतीवर वरच्या बाजूलाच का लावलेला असतो याचा विचार केला का? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला जाणून घेऊ एसी भींतीवर का लावले जातात. मुळात एसी भींतीवर लावण्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. रूममध्ये कूलिंग कायम रहावं म्हणून एसी भींतीवर वरच्या बाजूला लावला जातो.
2 / 5
एअर कंडीशनमधून थंडगार हवा बाहेर येते. या हवेचा प्रवाह नेहमी जमिनीकडे असतो. हीच बाब लक्षात घेऊन एसी भींतीवर वरच्या बाजूला इन्स्टॉल केला जातो. तेच हीटर नेहमीच जमिनीच्या जवळ लावलं जातं.
3 / 5
याचं मुख्य कारण हे आहे की, गरम हवा फार हलकी असते आणि ती नेहमी वरच्या दिशेने जाते. तुम्ही कधीतरी लक्ष द्या की, जेव्हा घरात एसी सुरू असतो. तेव्हा यादरम्यान थंड हवा खालच्या दिशेने प्रवास करते. तेच गरम हवा वरच्या दिशेने जाते. या संपूर्ण प्रोसेसला संवाहन म्हणतात.
4 / 5
या कारणामुळेच जेव्हा घरात एसी सुरू असतो, तेव्हा घरातील खालच्या बाजूच्या तापमानापेक्षा वरचं तापमान जास्त असतं. त्यामुळे एसी भींतीवर वरच्या बाजूला लावला जातो.
5 / 5
दरम्यान एसी वरच्या गरम हवेला खेचून बाहेर काढण्याचंही कार्य करतो. त्यामुळे त्याच्या आउटर भागाकडे गरमी राहते. तेच जर एसी चुकून खालच्या बाजूला लावला तर त्याची थंड हवा खाली फरशीकडेच राहणार. याने रूम पूर्णपणे थंड होऊ शकणार नाही.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके