Why are the doors of toilets in malls, movie theaters cuts from down?; Know the reason behind it!
मॉल्स, चित्रपटगृहातील टॉयलेट्सचे दरवाजे खालून उघडे का असतात?;जाणून घ्या त्यामागील कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 9:51 AM1 / 6तुम्ही अनेकदा खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी चित्रपटगृह, मॉलमध्ये गेला असाल. यावेळी तुमचे लक्ष त्याठिकाणी असलेल्या टॉयलेटकडे नक्की गेले असेल. मॉलमधील टॉयलेट्स एका खास पद्धतीने बनवलेले आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल. मॉलमधील दरवाजे खालून उघडे असतात.2 / 6घर किंवा हॉटेलच्या खोलीतील शौचालयाचा दरवाजा वरपासून खालपर्यंत असतो, परंतु शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, रुग्णालये या सार्वजनिक टॉयलेट्सला पूर्ण दरवाजे नसतात. या टॉयलेट्सच्या दरवाजांना खालून गॅप असतो. 3 / 6सर्वात पहिलं कारण तर हे आहे की, याने स्वच्छता करताना सोपं काम होतं. पब्लिक टॉयलेट्सचा वापर अनेक लोक करतात. त्यामुळे लवकर बेकार होतात. अशात खालून उघड्या दरवाज्यांमुळे फ्लोर पुसण्यास सोपं होतं. 4 / 6टॉयलेट्सच्या दरवाजांना खालून गॅप असल्यामुळे टॉयलेटमध्ये चांगले वेंटिलेशन आणि प्रकाश असतो. टॉयलेट्सचा वापर करणारी एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यास, अशा प्रकारे दरवाजे असल्यास सदर व्यक्तीला सहज बाहेर काढता येऊ शकतं.5 / 6अनेकदा काही लोक पब्लिक टॉयलेट्सचा वापर अश्लिल कृत्य करण्यासाठी करतात. लोकांनी असे प्रकार करू नये म्हणूनही टॉयलेटचे दरवाजे खालून छोटे ठेवले जातात.6 / 6सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं गुन्हा आहे. त्यामुळे अनेक जण टॉयलेटमध्ये जाऊन स्मोकिंग करतात. पण असं करणं धोकादायक ठरू शकतं. बंद टॉयलेटमध्ये धूर कोंडून श्वास गुदमरू शकतो. पण दरवाजा खालून उघडा असल्याने धोका टळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications