Why are tree trunks painted white and red What is the reason behind this Find out
झाडांच्या खोडाला सफेद आणि लाल रंगानं का रंगवलं जातं? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 11:37 AM1 / 7रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांचा खालचा भाग आपण सफेद आणि लाल पेंटनं रंगवलेला अनेकदा पाहिला असेल. पण असं का केलं जातं असा विचार आपल्याला पडतो आणि सफेद रंगच का वापरला जातो? तर यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. 2 / 7झाडांना पेंट करण्यामागे एक हेतू आहे तो म्हणजे झाडांना कीड लागण्यापासून सुरक्षा करणं. झाडांना एकदा कोणतीही कीड लागली की ती त्या संपूर्ण झाडाला पोकळ करुन टाकते. पण त्यावर पेंट केल्यानं झाडाला कीड लागत नाही आणि ते सुरक्षित राहतात. 3 / 7तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. झाडांच्या खोडाला सफेद आणि लाल पेंटनं रंगवलं जातं. 4 / 7हिरव्यागार बहरलेल्या झाडाला खोडाजवळ चिरा पडण्यास सुरुवात होते. यामुळे झाडं कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे झाडं मजबूत राहावीत यासाठीच त्यांना खालच्या बाजूला सफेद रंगानं रंगवलं जातं. 5 / 7झाडांना असा रंग दिल्यानं झाडाच्या सुरक्षेत सुधार होतो. याशिवाय संबंधित झाड वन विभागाच्या देखरेखीखाली आहे याचाही संकेत यातून मिळतो. त्यामुळे त्यांची छाटणी केली जात नाही.6 / 7राष्ट्रीय महामार्गानजिकच्या झाडांना सफेद रंगानं रंगवलं जातं. त्यामुळे रात्रीच्या प्रवासातही ही झाडं सहजपणे दिसून येतात. 7 / 7रात्रीच्या वेळेस सफेद रंग स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना याची मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications