Why brains were removed from dead heads without permission?; So far 10 thousand Brains accumulated
विना परवानगी मृतदेहाच्या डोक्यातून का काढले मेंदू?; आतापर्यंत १० हजार Brain जमा By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 1:00 PM1 / 10जगात एक अशी जागा देखील आहे जिथे सुमारे १०,००० मानसिक रुग्णांचे मेंदू साठवले गेले आहेत. पण असे का केले गेले हा प्रश्न आहे. आजच्या काळात त्याचा उपयोग काय? 2 / 10हे जगातील सर्वात मोठे संकलन असल्याचे सांगितले जाते. हा संग्रह १९४५ ते १९८० च्या सुरुवातीच्या काळातला आहे. हे ठिकाण डेन्मार्क विद्यापीठात आहे. 3 / 10मानसिक रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहातून काढलेले मेंदू पांढऱ्या रंगाच्या फॉर्मेलिनच्या बादल्यांमध्ये साठवले जातात.4 / 10बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ब्रेन कलेक्शनचे हेड पॅथॉलॉजिस्ट मार्टिन वीरेनफेल निल्सन यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. ज्या चाचण्या झाल्या त्याही सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. 5 / 10५० वर्षांनंतर किंवा त्याहूनही अधिक कालावधीनंतर, आपल्यापेक्षा जास्त जाणणारा कोणीतरी येईल हे शक्य आहे. 6 / 10मर्जीविना मेंदू काढला - आजच्या काळात मानसिक आरोग्यावर चर्चा अधिक वाढली आहे. जुन्या काळी असे नव्हते. अहवालानुसार, डेन्मार्कमधील मानसशास्त्र संस्थेतील रुग्णांचे मेंदू त्यांच्या संमतीशिवाय काढून घेतले आहेत. 7 / 10या संस्थांमध्ये काय घडले असते, असा सवाल कोणीही केला नाही, असे इतिहासकार सांगतात. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना खूप कमी अधिकार होते. त्याच्या संमतीशिवाय त्याच्यावर कोणत्याही प्रकारे उपचार केले जाऊ शकतात.8 / 10१९९० मध्ये, डॅनिश एथिक्स कौन्सिलने निर्णय घेतला की, या मेंदूंचा संशोधनासाठी वापर केला जाईल. जर कुणाला मानसिक आजाराबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हे उपयुक्त ठरेल. 9 / 10गेल्या काही वर्षांत, स्मृतिभ्रंश आणि नैराश्य यासह अनेक आजार समजून घेण्यात मदत झाली आहे. सध्या, मानसिक आजाराशी संबंधित चार प्रोजेक्ट आहेत. 10 / 10ज्यासाठी हा संग्रह उपयुक्त ठरत आहे. यामुळे मानवी मेंदूमध्ये आतापर्यंत किती बदल झाले आहेत हे कळण्यासही मदत होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications