शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिस्किटांमध्ये का असतात इतकी छिद्र?; केवळ डिझाईन नव्हे तर त्यामागे आहे वैज्ञानिक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 2:53 PM

1 / 11
क्रिस्पी, टेस्टी, यमी बिस्किट(Biscuits) खायचा कुणाला आवडणार नाही...चहासोबत बिस्किट हे समीकरण आजही अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यासारखं आहे. बिस्किट मार्केटमध्ये कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सगळेच बिस्किटाचे चाहते असतात.
2 / 11
आज बाजारात अनेक फ्लेवर्स आणि विविध रंगाची, आकाराची बिस्किटं उपलब्ध आहेत. महिनाभराच्या घरगुती सामानातही बिस्किटाची यादी दिली जाते. बाजारात वाढणाऱ्या बिस्किटांच्या मागणीमुळेही या क्षेत्रात अनेक उत्पादन कंपन्या आल्या आहेत.
3 / 11
बाजारात विविध प्रकारची बिस्किटं विक्रीसाठी आहेत. जी बिस्किटं लहान मुलांना आवडतात ती लहान मुलांची बिस्किटं बनतात. डायबेटिस रुग्णांसाठी आता सुगर फ्री बिस्किट आली आहेत. चॉकलेटपासून नानकटाई पर्यंत विविध व्हरायटी पाहायला मिळतात.
4 / 11
बाजारात इतक्या प्रकारची बिस्किटं आहेत की, कधी कधी कुठलं बिस्किट खरेदी करायचं, कुठलं खायचं त्यात ग्राहकांचा गोंधळ उडतो. पण तुम्ही कधी पाहिलंय का? बिस्किट्समध्ये फ्लेवरपासून डिझाईनपर्यंत विविध डिझाईन असतात.
5 / 11
या बिस्किटात अनेक बिस्किट असे पाहायला मिळतात ज्यात तुम्हाला छिद्र दिसत असतील. एका बिस्किटात इतक्या जास्त संख्येने छिद्र का असतात याचा विचार केलाय का? चला मग आम्ही तुम्हाला सांगतो, बिस्किटात असणाऱ्या छिद्रामागे काय कारण आहे?
6 / 11
तुम्ही कधी स्वीट अँन्ड सॉल्टी चवदार बिस्किटं खाल्ली असतील. त्यावर छिद्र असतात. अनेकांना वाटतं की, ही छिद्र बिस्किटाची डिझाईन आहे. हा, ही एक सर्वसामान्य बाब आहे. परंतु या छिद्राचा त्यांच्या उत्पादनाशीही थेट संबंध असतो.
7 / 11
या छिद्रामागे वैज्ञानिक कारणही आहे. या छिद्रांना डॉकर्स म्हणून संबोधतात. छिद्र असण्याचं प्रमुख कारण म्हणजे ज्यावेळी बिस्किटाचं उत्पादन होत असते तेव्हा याच छिद्रातून हवा जाण्यासाठी मार्ग असतो. ज्यामुळे ही बिस्किटं आणखी फुगतात.
8 / 11
आता ही छिद्र बनवतात कशी? हे जाणून घेऊया. बिस्किट बनवण्याआधी पीठ, साखर आणि मीठ एका ट्रे मध्ये पसरवून मशीनच्या खाली ठेवलं जातं. त्यानंतर मशीन यात छिद्र बनवतं. विना छिद्र कुठलंही बिस्किटं ठीकपणे बनू शकत नाही.
9 / 11
बिस्किट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यात काही हवा भरली जाते. जी ओव्हनमध्ये हिट करण्याच्या वेळी गरम होऊन फुगते. त्यामुळे बिस्किटचा आकार मोठा होण्यासोबतच तो डिशेप होऊ लागतो. आकार मोठ्या होण्यापासून रोखण्यासाठी त्यात छिद्र बनवण्यात येतात.
10 / 11
हायटेक मशीनद्वारे ही छिद्र एका समान अंतरावर एकसारखी बनवली जातात. त्यामुळे बिस्किट चहूबाजूने एकाच प्रमाणात योग्य रित्या तयार होते. बिस्किटात तितकेच छिद्र बनवले जातात. जितके ते भाजल्यानंतर क्रंची आणि क्रिस्पी बनतील.
11 / 11
छिद्र बनवण्यामागचं एक वैज्ञानिक कारण म्हणजे त्यामुळे हिट बाहेर पडली जाते. जर छिद्र नसते तर बिस्किटातून हिट बाहेर पडली नसती त्यामुळे मध्येच ती बिस्किटं तुटली असती.