Why Do Doctors Wear Green Or Blue Scrubs? api
ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 11:36 AM1 / 12सद्या कोरोनाचं थैमान जगभरात पसरलं आहे. हजारो लोकांचा जीव कोरोनाने घेतला आहे. दरम्यान जगभरातील डॉक्टर्स, वैज्ञानिक, नर्स हे सगळेच आपली सेवा चोख बजावत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते कोरोनाशी दोन हात करताना दिसतात. 2 / 12हे डॉक्टर-नर्स जेव्हा तुम्ही बघता किंवा हॉस्पिटलचं दृश्य बघता तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पडदे दिसतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, अखेर ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडेच का घालतात? लाल, पिवळ्या किंवा इतर कोणत्या रंगाचे का घालत नाहीत? तसं कोरोनात ऑपरेशनची गरज नाही. पण डॉक्टरांच्या या गोष्टीचीही माहिती असावी म्हणून हा लेख.3 / 12सामान्यपणे आधी डॉक्टरपासून ते हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी हे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरत होते. आताही काही डॉक्टर पांढरे कपडे वापरतात. पण 1914 मध्ये एका प्रभावशाली डॉक्टरांनी ही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांनी परंपरा बदलून हिरव्या रंगाचे कपडे समोर आणले.4 / 12काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे किंवा पांढरे वापरतात. इतकेच नाही तर हॉस्पिटलच्या पडद्यांचा रंगही हिरवा किंवा निळा असतो. त्यासोबतच हॉस्पिटलचे कर्मचारी यांचे कपडे आणि मास्कही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात. 5 / 12आता बाहेर आपण कोरोनापासून बचावासाठी हिरवे मास्क अधिक बघतोय. अशात प्रश्न पडतो की, हिरव्या किंवा निळ्या रंगात असं काय खास असतं, जे इतर रंगांमध्ये नसतं?6 / 12एका मीडिया रिपोर्टनुसार, सर्जरीवेळी डॉक्टरांनी हिरव्या रंगाचे कपडे घालणे सुरू केले, कारण या रंगाने डोळ्यांना आराम मिळतो. असं अनेकदा होतं की, आपण एखादा ठराविक रंग नेहमी बघत राहिलो तर आपल्या डोळ्यांना थकवा जाणवतो. 7 / 12आपले डोळे सूर्याकडे किंवा दुसऱ्या चमकदार वस्तूकडे बघून चमकतात. पण त्यानंतर जेव्हा आपण लगेच हिरव्या रंगाककडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांना आराम मिळतो, थंडावा जाणवतो.8 / 12मुळाच याचं कारण हे आहे की, हिरवा आणि निळा रंग दृश्य प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर लालच्या विरूद्ध आहे आणि एका ऑपरेशन दरम्यान एक सर्जन जवळपास नेहमीच केवळ लाल रंगावर लक्ष केंद्रीत करत असतो किंवा त्यांना करावं लागतं.9 / 12इतकेच नाही वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितलं गेलं तर आपल्या डोळ्यांची जैविक निर्मिती अशी झाली आहे की, हे मुळात लाल, हिरवा आणि निळा रंग बघण्यात सक्षम आहेत. या तीन रंगाच्या मिश्रणातून तयार झालेले कोट्यवधी रंगांची ओळख मनुष्याचे डोळे पटवू शकतात. पण इतर रंगांच्या तुलनेत आपले डोळे हिरवा किंवा निळा रंग अधिक चांगला बघू शकतात.10 / 12असे मानले जाते की, डोळ्यांना हिरवा किंवा निळा रंग फार टोचत नाही. जेवढा लाल आणि पिवळा डोळ्यांना टोचतो. त्यामुळे हिरवा आणि निळा रंग डोळ्यांसाठी चांगला मानला जातो. 11 / 12याच कारणाने हॉस्पिटलमधील पडद्यांपासून ते कर्मचाऱ्यांचे कपडेही हिरव्या आणि निळ्या रंगाचे असतात. जेणेकरून हॉस्पिटलमधील रूग्णांच्या डोळ्यांना आराम मिळावा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये.12 / 12डॉक्टर ऑपरेशन करताना हिरव्या रंगाचे कपडेच घालतात, कारण त्यांना सतत रक्त आणि मानवी शरीरातील अंग बघावे लागतात. त्याने त्यांना मानसिक तणाव येऊ शकतो. अशात त्यांना हिरवा आणि रंग आराम देऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications