शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का वापरतात डॉक्टर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 2:53 PM

1 / 11
हॉस्पिटलच्या नावाने कुणीही घाबरतात. पण कधीना कधी सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सगळीकडे हिरव्या रंगाचे पडदे दिसतात. सोबतच ऑपरेशन थिएटरमध्येही डॉक्टर हिरव्या रंगाचेच कपडे वापरतात. पण हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच का कपडे वापरते जातात? चला जाणून घेऊ कारण....
2 / 11
तुम्ही कधी विचार केलाय का की, अखेर ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात? तेच आज आम्ही सांगणार आहोत.
3 / 11
आधी डॉक्टरपासून ते हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी हे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरत होते. आताही काही डॉक्टर पांढरे कपडे वापरतात. पण 1914 मध्ये एका प्रभावशाली डॉक्टरांनी ही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांनी परंपरा बदलून हिरव्या रंगाचे कपडे समोर आणले.
4 / 11
काही डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे किंवा पांढरे वापरतात. इतकेच नाही तर हॉस्पिटलच्या पडद्यांचा रंगही हिरवा किंवा निळा असतो. त्यासोबतच हॉस्पिटलचे कर्मचारी यांचे कपडे आणि मास्कही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात.
5 / 11
एका मीडिया रिपोर्टनुसार, सर्जरीवेळी डॉक्टरांनी हिरव्या रंगाचे कपडे घालणे सुरू केले, कारण या रंगाने डोळ्यांना आराम मिळतो. असं अनेकदा होतं की, आपण एखादा ठराविक रंग नेहमी बघत राहिलो तर आपल्या डोळ्यांना थकवा जाणवतो.
6 / 11
आपले डोळे सूर्याकडे किंवा दुसऱ्या चमकदार वस्तूकडे बघून चमकतात. पण त्यानंतर जेव्हा आपण लगेच हिरव्या रंगाककडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांना आराम मिळतो, थंडावा जाणवतो.
7 / 11
मुळाच याचं कारण हे आहे की, हिरवा आणि निळा रंग दृश्य प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर लालच्या विरूद्ध आहे आणि एका ऑपरेशन दरम्यान एक सर्जन जवळपास नेहमीच केवळ लाल रंगावर लक्ष केंद्रीत करत असतो किंवा त्यांना करावं लागतं.
8 / 11
वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितलं तर आपल्या डोळ्यांची जैविक निर्मिती अशी झाली आहे की, हे मुळात लाल, हिरवा आणि निळा रंग बघण्यात सक्षम आहेत. या तीन रंगाच्या मिश्रणातून तयार झालेले कोट्यवधी रंगांची ओळख मनुष्याचे डोळे पटवू शकतात. पण इतर रंगांच्या तुलनेत आपले डोळे हिरवा किंवा निळा रंग अधिक चांगला बघू शकतात.
9 / 11
असे मानले जाते की, डोळ्यांना हिरवा किंवा निळा रंग फार टोचत नाही. जेवढा लाल आणि पिवळा डोळ्यांना टोचतो. त्यामुळे हिरवा आणि निळा रंग डोळ्यांसाठी चांगला मानला जातो.
10 / 11
याच कारणाने हॉस्पिटलमधील पडद्यांपासून ते कर्मचाऱ्यांचे कपडेही हिरव्या आणि निळ्या रंगाचे असतात. जेणेकरून हॉस्पिटलमधील रूग्णांच्या डोळ्यांना आराम मिळावा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये.
11 / 11
डॉक्टर ऑपरेशन करताना हिरव्या रंगाचे कपडेच घालतात, कारण त्यांना सतत रक्त आणि मानवी शरीरातील अंग बघावे लागतात. त्याने त्यांना मानसिक तणाव येऊ शकतो. अशात त्यांना हिरवा आणि रंग आराम देऊ शकतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेdoctorडॉक्टर