Why does iron rust? Find out what's the scientific reason behind this
लोखंडाला गंज का येतो? जाणून घ्या काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 3:19 PM1 / 4 लहानपणापासून आपण वडिलधाऱ्यांकडून एक म्हण नक्कीच ऐकली आहे की, 'काम करत राहा, नाहीतर लोखंडाला जसा गंज चढतो तसाच आपल्या शरीरालाही गंज चढेल.' घरामध्ये असलेल्या लोखंडी वस्तूंवर गंज आलेला तुम्ही पाहिला असेल. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की, लोखंडाला गंज का आणि कसा चढतो? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामागचे वैज्ञानिक कारण.2 / 4 तुम्ही घरात एखादी नवीन लोखंडी वस्तू आणलेली असते, तेव्हा ती अतिशय चमकदार दिसते. पण, याच लोखंडावर पाणी पडल्यास त्यावर गंज यायला सुरुवात होते. अनेकदा आपण लक्ष देत नाहीत, पण एखाद्या नवीन लोखंडी वस्तूवर सतत पाणी पडत राहिल्यास, त्यावर लाल रंगाचा थर जमा होतो, त्याला गंज म्हणतात. पण, पाण्यात असं काय आहे, ज्यामुळे लोखंडावर गंज चढतो ?3 / 4 लोखंड अतिशय मजबूत धातू मानला जातो, पण त्यावर पाणी पडल्यास त्याची कठोरता कमकुवत व्हायला सुरुवात होते. एकदा का लोखंडाला गंज लागला की, त्याचा परत उपयोग होत नाही. लहानपणी आपण विज्ञानाच्या पुस्तकात शिकलो आहोत की, लोह ऑक्सिजन आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर एक प्रक्रिया होते आणि यामुळेच लोखंड खराब होऊ लागतं. यामुळे लोखंडाचा रंग बदलतो, त्यालाच लोहाचा गंज म्हणतात.4 / 4 गंज म्हणजे हळूहळू नष्ट होणे. जेव्हा धातू आर्द्रतेच्या संपर्कात येतो तेव्हा त्यावर गंज चढतो. लोखंडाचा गंज ही एक गंभीर समस्या आहे. केवळ लोखंडच नाही तर चांदीवरही काळा लेप चढलेला तुम्ही अनेकदा पाहिला असेल. याशिवाय, तांब्यावरही हिरव्या रंगाचा लेप येतो. गंज टाळण्यासाठी लोखंड किंवा इतर धातूंना ओलाव्यापासून धूर ठेवावे. यामुळे लोह किंवा इथर धातूंचे आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications