शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोंबडा भल्या पहाटे का आरवतो? कारण असं जे तुम्हालाही नसेल माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:47 IST

1 / 7
तुम्ही गावात कधी अनुभवलं असेल किंवा टीव्ही-व्हिडिओत बघितलं असेल की, सूर्योदय होताच सकाळी कोंबडा आरवतो. अशात सकाळी सकाळी साखरझोपेत असताना कोंबड्याच्या आरवण्याने नक्कीच झोपमोड होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, कोंबडा सकाळी का आरवतो? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. तेच जाणून घेऊया.
2 / 7
कोंबड्यांच्या शरीरात एक जैविक घड्याळ असते ज्याला सिरकेडियन रिदम म्हटलं जातं. ही घड्याळ त्यांच्या शरीराला २४ तासांच्या चक्रात काम करण्यास निर्देशित करते. सूर्योदयावेळी प्रकाशात बदल झाल्याने ही घड्याळ सक्रिय होते आणि कोंबड्या आरवण्याचा संकेत देते.
3 / 7
कोंबड्यांचे डोळे प्रकाशाप्रति खूप संवेदनशील असतात. सूर्योदयावेळी प्रकाशात होणाऱ्या बदलाला कोंबडे लगेच पकडतात आणि हे त्यांच्या मेंदुला आरवण्याचा संकेत देतात.
4 / 7
कोंबडा आरवण्याचा आवाज काढून आपल्या समूहातील इतर सदस्यांना सुचित करतो की, दिवसाला सुरूवात झाली आहे आणि झोपेतून जागे व्हा. हा एकप्रकारचा सामाजिक व्यवहार आहे.
5 / 7
कोंबडे आपल्या आवाजाने परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कोंबड्यांना इशारा देतात. हा त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा करण्याची एक पद्धतही आहे.
6 / 7
काही कोंबडे तर मादा कोंबड्यांना आकर्षित करण्यासाठीही आरवतात. हा त्यांच्या प्रजनन व्यवहाराचा भाग आहे. म्हणून कोंबडे अनेकदा दुपारच्या वेळीही आरवताना ऐकायला मिळतं.
7 / 7
हिवाळ्यात कोंबड्यांच्या आवरण्याला वेळेचा संकेत मानलं जातं. शेतकरी आणि इतर लोकांसाठी कोंबड्याचं आरवणं दिवसाची सुरूवात झाल्याचा संकेत आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स