Why is one corner of the SIM card cut off? Do you know, the real reason is beyond your imagination
SIM कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, माहिती आहे का? तुमच्या कल्पनेपलिकडे आहे खरं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 6:38 PM1 / 5मोबाईल ही आज अनिवार्य बाब बनली आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये घालण्यात येणारं सिमकार्डही सर्वांना माहितीचं झालं आहे. मात्र या सिमकार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? नक्कीचं या मागचं खरं कारण तुम्हाला माहिती नसेल. हे कारण पुढील प्रमाणे आहे. 2 / 5सिमकार्डचा एक कोपरा कापलेल्या असण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. सिमकार्ड मोबाईल फोनमध्ये व्यवस्थित लावता यावे म्हणून सिमकार्डचा एक कोपरा कापलेला असतो. त्याबरोबरच सिमकार्ड उलटं आहे की सरळ हे सहज समजावे म्हणून सिमचं डिझाइन अशा प्रकारे बनवलं जातं. जर सिम उलटं घातलं तर त्याची चिप खराब होण्याचा धोकाही असतो. 3 / 5जक सिमकार्डमधील एक कोपरा कापलेला नसता तर आपल्यासाठी मोबाईल फोनमध्ये सिमकार्ड व्यवस्थित लावणं कठीण झालं असतं. त्यामुळे मोबाईलमध्ये सिम हे चुकीच्या बाजूने टाकण्याचे प्रकार घडले असते. मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिमकार्डी रुंदी २५ एमएम, लांबी १५ एमएम आणि जाडी ०.७६ एमएम असते. 4 / 5 सिमकार्डचा फुलफॉर्म तुम्हाला माहिची आहे का? सिमकार्डचा फुलफॉर्म सब्स्क्रायबर (S) आयडेंटिटी (I) मॉड्युल (M) असा आहे. ते कार्ड ऑपरेटिंग सिस्टिम चालवणारा एक इंटिग्रेटेड सर्किट आहे. तो इंटरनॅशनल मोबाईल ग्राहक आयडेंटिफिकेशन (आयएमएसआय) नंबर आणि त्याच्याशी संबंधित की ला सिक्युअर पद्धतीने स्टोअर करते. 5 / 5 हा नंबर आणि की चा वापर मोबाईल टेलिफोनी डिव्हाईसवर ग्राहकांना ओळखण्यासाठी आणि ऑथेंटिकेट करण्यासाठी केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications