शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नानंतर फिरायला जाण्याला हनीमून का म्हटलं जातं? चंद्र आणि मधाचा काय आहे यात संबंध...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 2:45 PM

1 / 8
लग्नानंतर जास्तीत जास्त लोक कोणत्या ना कोणत्या हिल स्टेशन किंवा एखाद्या बर्फाळ ठिकाणी फिरायला जातात. लग्नानंतर फिरायला जाण्याला हनीमून असं म्हणतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, लग्नानंतर फिरायला जाण्याला हनीमून का म्हणतात? याचा मून म्हणजे चंद्रासोबत आणि हनी म्हणजे मधासोबत काय संबंध आहे? हनीमून शब्द आला कुठून?
2 / 8
चला जाणून घेऊ हनीमून शब्दाची कहाणी काय आहे. पहिली गोष्ट तर या शब्दाचा भारताशी काही संबंध नाही. पण हा शब्द आता खूप चलनात आहे. भारतातील जोडपे आधीच ठरवतात की, ते हनीमूनला कुठे जाणार. हनीमून शब्द हा इंग्रजी शब्द Hony आणि Moone पासून तयार झाला आहे.
3 / 8
हनीमून शब्दातील Hony चा अर्थ लग्नाची मधुरता आणि आनंद. म्हणजे लग्नाच्या लगेच नंतर मिळणाऱ्या आनंदाला या शब्दाशी जोडण्यात आलं आहे. त्याशिवाय यूरोपमध्ये लग्नादरम्यान नवीन जोडप्याला मध आणि पाण्यापासून तयार अल्कोहोल ड्रिंक दिलं जातं. त्यामुळेही लग्नानंतरच्या काही वेळासाठी हनी म्हणजे मधासोबत जोडलं गेलं आहे.
4 / 8
हनीमूनमध्ये Moone शब्द शारीरिक चक्राला दर्शवतो. याकडे एका अशा काळासारखं बघण्यात आलं, जेव्हा शरीरात खास प्रकारचे बदल होतात. मुळात चंद्राच्या आधारावरच वेळेची मोजणी करण्यात येते. आता दोन्ही शब्दांना मिळून बनलेल्या हनीमूनमध्ये हनीचा अर्थ आनंद आणि मूनचा अर्थ वेळ असा होतो. सोप्या शब्दात सांगायचं तर हा लग्नानंतरचा आनंद देणारा काळ असतो.
5 / 8
लग्न आणि लग्नानंतरच्या आनंद देणाऱ्या वेळेला हनीमून पीरिअडही म्हटलं जातं. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर लग्नानंतर कपल एन्जॉय करतात तेव्हा त्याला हनीमून म्हणतात. लग्नानंतर कपल फिरायला जाओ अथवा न जाओ, लग्नानंतरच्या काही दिवसांना हनीमूनच म्हटलं जातं.
6 / 8
फ्रेंचमध्ये हनीमूनला lune de miel म्हटलं जातं. जर्मनीत याला flitterwhochen म्हणतात. हनीमून शब्दाचा वापर फ्रान्समध्ये 18व्या शतकात केला जात होता. पण 19 व्या शतकात याचा जास्त वापर होऊ लागला. वेगवेगळ्या देशांमध्ये आणि संस्कृतीमध्ये हनीमून पीरीअड साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत.
7 / 8
वर्ल्डवाइड वर्ड्स वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, हनीमून शब्दाचा वापर पहिल्यांदा 16व्या शतकात रिचर्ड ह्यूलोट नावाच्या व्यक्तीने केला होता. काही लोकांचं मत आहे की, हनीमून शब्दाचा वापर पहिल्यांदा बेलीबोनमध्ये करण्यात आला. याचा वापर 4 हजार वर्षापासून केला जात आहे.
8 / 8
बेबीलोनमध्ये लग्नानंतर नवरीचे वडील नवरदेवाला एक महिन्यानंतर गिफ्ट म्हणून मधापासून तयार दारू देतात. हे लूनर कॅलेंडरनुसार दिली जाते. बेबीलोनमध्ये या महिन्याला हनीमंथ म्हणतात. हळूहळू हनीमंथचं हनीमून होत गेलं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके