why king of hearts doesn't have mustache? know why
पत्त्यांच्या खेळातील प्रत्येक राजाला मिशा आणि बदामच्या राजाला का नाही? कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 3:19 PM1 / 11बरेच लोक रिकामा वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळतात. हा लोकांचा आधीही आवडीचा खेळ होता आणि आताही आहे. आता भलेही लोक मोबाईलवर गेम खेळतात, पण त्यांना पत्ते खेळायला आवडतं. भारतातील अनेक भागात आजही पत्ते खेळताना लोकांना पाहिलं जातं.2 / 11या खेळात चार रंगांच्या चार राजांचं फारच वजन असतं. अनेकांनी कधीना कधी हा गेम खेळला असेल. पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, चार रंगांच्या राजांमध्ये तीनच राजांना मिशा असतात आणि एकाला का नसतात? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.3 / 11हे पत्ते पूर्ण ५२ असतात आणि चार रंगाचे चार राजा असतात. पण यातील एका राजाला मिशाच नसतात. मिशा नसलेला हा राजा असतो लाल पानाचा म्हणजे बदामचा राजा. ज्याला किंग ऑफ हार्ट असंही म्हणतात.4 / 11याबाबत असं सांगितलं जातं की, जेव्हा पत्त्यांचा खेळ अस्तित्वात आला तेव्हा बदामच्या राजाला मिशा असायच्या. पण जेव्हा हे पत्ते पुन्हा डिझाइन करण्यात आले तेव्हा डिझायनर या बदामच्या राजाला मिशा काढणं विसरला. आश्चर्याची बाब म्हणजे डिझायनरची ही चूक कधी सुधारली गेली नाही आणि आतापर्यंत किंग ऑफ हार्ट मिशा नसलेलाच आहे. 5 / 11एक मान्यता आहे की, पत्त्याच्या खेळात हे जे ४ राजा आहेत ते सर्वच इतिहासातील काही महान राजांना समर्पित आहेत. असं मानलं जातं की, हुकुमचा राजा हा इस्त्राइलचा पुरातन युगातील राजा आहे. ज्याचं नाव डेविड होतं. त्यानंतर चिडीच्या राज्याबाबत सांगितलं जातं की, हे पान मेसाडोनियाचा जग जिंकणारा राजा सिकंदरला समर्पित आहे.6 / 11हे नाव त्याला देण्यात आलं कारण त्याच्या डोक्याच्या मागे तलवार दिसते. या तलवारीला डोक्यामागून हल्ला करणाऱ्या शस्त्राच्या रूपात पाहिलं जातं. पण नंतर हे डिझाइन बदललं गेलं आणि या फोटोत कुऱ्हाड दिसू लागली होती.7 / 11पत्ते खेळण्याचं चलन फार पूर्वी सुरू झालं होतं. असं सांगितलं जातं की, सर्वातआधी यूरोपमध्ये लोकांनी पत्ते खेळणं सुरू केलं. हा काळ १४व्या शतकाचा होता. असंही म्हणतात की, एकेकाळी वेगवेगळ्या ठिकाणी पत्त्यांची संख्या आणि त्याचं डिझाइन वेगवेगळं असायचं.8 / 11त्यानंतर १६व्या शतकाच्या शेवटी काही फ्रेंच कार्ड मेकर्सनी पत्ते डिझाइन केले. यात सर्व रंगाच्या राजांसाठी नवे डिझाइन केले गेले. हा तोच काळ होता जेव्हा पत्त्यांमधील राजांना जगातील महान राजांना जोडून बघितलं जात होतं.9 / 11काही असेही दावे केले जातात की, पत्त्यांचं डिझाइन १८व्या शतकाच्या शेवटपर्यंत सुरू होतं. त्यासोबतच असाही दावा केला जातो की, पत्ते बुद्धीबळासारखे शाही भूतकाळाशी जुळलेले आहेत. पण यातील राजा कोणत्याही खास व्यक्तीला दर्शवत नाही.10 / 11काही वेबसाइट्सचा असाही दावा आहे की, इंग्लिश किंग कार्ड्सचं कनेक्शन कधी ऐतिहासिक राजांसोबत जोडलं गेलं नाही. ऐतिहासिक राजा आणि पत्त्यांमधील राजांचं संबंध जोडण्याची आयडिया फ्रेन्च लोकांची होती. तेच पत्त्यांमधील बदामचा राजा म्हणजे किंग ऑफ हार्टला अनेक ठिकाणी सुसाइड किंग असंही म्हटलं जातं.11 / 11हे नाव त्याला देण्यात आलं कारण त्याच्या डोक्याच्या मागे तलवार दिसते. या तलवारीला डोक्यामागून हल्ला करणाऱ्या शस्त्राच्या रूपात पाहिलं जातं. पण नंतर हे डिझाइन बदललं गेलं आणि या फोटोत कुऱ्हाड दिसू लागली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications