Why the last Nizam of Hyderabad Mir Osman Ali Khan given 5000 kg of gold to India
हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने भारत सरकारला खरंच दान दिलं होतं का ५ हजार किलो सोनं? By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 5:14 PM1 / 8जेव्हा भारतातील शाही घराण्यांचा विषय निघतो तेव्हा त्यात हिंदू राजे-महाराजांसोबतच लखनौचे नवाबासोबतच हैद्राबादच्या निजामाचाही उल्लेख होतो. असं म्हणतात की, एक वेळ अशीही होती की जेव्हा भारतीय उपमहाद्वीप ५६५ रियासतींमध्ये विभागला होता. स्वातंत्र्यानंतर काही संस्थानं सोडून इतरांचा विलय करण्यात आला. इतर राहिलेल्या संस्थानांचा भारतात समावेश केला. ज्यातील एक हैद्राबाद संस्थान होतं.2 / 8हैद्राबादच्या निजामांशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्यातील एक किस्सा अखेरच्य निजामाने भारताला ५ हजार किलो सोनं दान दिलं होतं. पण यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊ.3 / 8मीर उस्मान अली खान हैद्राबाद संस्थानचे शेवटचे निजाम होते. ते महबूब अली खानचे दुसरे पुत्र होते. ते १९११ ते १९४८ पर्यंत हैद्राबाद संस्थानचे निजाम होते. त्यानंतर अनेक वर्ष ते नाममात्र निजाम राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हैद्राबाद हे स्वतंत्र संस्थान ठेवायचं होतं. त्यावेळी भारत सरकारने त्यांना अनेकदा भारतात सामिल होण्यास सांगितलं. पण ते अडून राहिले.4 / 8मात्र, नंतर त्यांना नाइलाजास्तव सरकारच्या दबावामुळे हैद्राबाद संस्थान भारतात सामिल करावं लागलं. भारत सरकारने त्यांना हैद्राबादचा राज प्रमुख बनवलं होतं. मीर उस्मान अली खान इंग्रजांच्या काळातही आपल्या श्रीमंतीसाठी ओळखले जात होते. असं सांगितलं जातं की, त्यांनी भारत सरकारला ५ हजार किलो सोनं दान दिलं होतं. यावरून हे दिसून येतं की, ते किती श्रीमंत होते.5 / 8१९६५ मध्ये भारत-पाक युद्ध झालं आणि भारताला यात विजय मिळाला. पण या युद्धामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. ही अर्थव्यवस्था जागेवर आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीने पैसा उभारणीसाठी आवाहन केलं होतं. यादरम्यान ते हैद्राबादचे निजाम यांनाही भेटले होते.6 / 8असे म्हणतात की, मीर उस्मान अली खानने बेगमपेट एअरपोर्टवर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच स्वागत केलं होतं. दोघांमध्ये बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर उस्मान अली ने पाच हजार किलो सोनं सरकारकडे दिलं.7 / 8असं मानलं जातं की, भारत सरकारकडे उस्मान अली खानने दान दिलेल्या ५ हजार किलो सोन्यासंबंधी काहीच माहिती नाही. तेच यासंबंधी RTI मध्ये यासंबंधी माहिती मिळाली की, उस्मान अली खानने सोनं दान केलं नव्हतं तर National Defense Gold Scheme मध्ये आपलं ४२५ किलो सोनं गुंतवलं होतं. ज्याचं त्यांना ६.५ टक्के दराने व्याजही मिळणार होतं.8 / 8असंही म्हटलं जातं की, मीर उस्मान अली खान थोडे कंजूस स्वभावाचे होते. जेव्हा हैद्राबादहून लोखंडी बॉक्समध्ये भरून सोनं दिल्लीला नेण्यात आलं, तेव्हा उस्मान अलीने सांगितलं होतं की, आम्ही केवळ सोनं दान करत आहोत. हे लोखंडी बॉक्स नाही. ते परत पाठवा. ते बॉक्स परत पाठवण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications