Why people feed snake to camel? Know the reason
उंटाच्या तोंडात का टाकला जातो जिवंत विषारी साप? कारण वाचून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 1:42 PM1 / 6वाळवंटातील जहाज म्हटल्या जाणाऱ्या उंटाच्या अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. जसे की, तो अनेक दिवस विना पाणी पिऊन तापत्या वाळूवर धावू शकतो. त्याशिवाय उंटीनीचं दूधही फार पौष्टिक मानलं जातं. तेच उंट एक शाकाहारी प्राणी आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, उंटाला साप खाऊ घातला जातो आणि तोही जिवंत. पण असं का केलं जातं हे जाणून घेऊ.2 / 6असं मानलं जातं की, अरब, आफ्रिकेच्या काही भागांमध्ये उंट पाळले जातात. त्यांचा वापर होतो. इथे उंटांसोबत एक विचित्र काम केलं जातं. असं म्हटलं जातं की, इथे उंटांना जिवंत साप खाऊ घातला जातो. असं का केलं जातं यामागेही फारच विचित्र कारण आहे.3 / 6असं मानलं जातं की, अनेकदा उंटांना एक अजब आजार होतो. ज्यामुळे उंट खाणं-पिणं सगळं सोडतो. तेच या आजारामुळे उंटाचं शरीर संथ होतं आणि मांसपेशी अकडू लागतात. हा आजार बरा करण्यासाठी विषारी सापाचा वापर केला जातो. उंटाचं तोंड वर उचलून त्याच्या तोंडात विषारी साप टाकला जातो आणि सोबतच पाणीही टाकलं जातं. जेणेकरून साप उंटाच्या पोटात जावा.4 / 6असं म्हणतात की, असं केल्याने सापाचं विष उंटाच्या शरीरात पसरतं. तसेच जसजसा विषाचा प्रभाव कमी होतो, उंट बरा होतो. विषाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यावर उंट पुन्हा खाऊ-पिऊ लागतो. मात्र, वैज्ञानिक रूपाने किती योग्य आहे याबाबत काही ठोस पुरावा उपलब्ध नाही. 5 / 6काही वेबसाईट्सनुसार, तर हा उंटाच्या आजारावरील पारंपारिक विधी आहे. एका वेबसाईटने या आजाराला Al-Heen नाव दिलं आहे. तर वेबासाईटने सांगितलं की, उंटात Hemorrhagic disease च्या उपचारासाठी ही प्रक्रिया केली जाते. पण ठोस परिणाम काय होतो याबाबत काहीच सांगितलं जाऊ शकत नाही.6 / 6यूट्यूबवर एका व्हिडीओ आहे ज्यात तुम्ही बघू शकता की, दोन लोक उंटाच्या तोंडात जिवंत साप टाकत आहेत. साप त्याच्या पोटात जावा यासाठी उंटाच्या तोंडात वरून पाणी टाकलं जातं. पण या व्हिडीओतून अशी काही ठोस माहिती मिळत नाही की, हे उंटाच्या उपचारासाठी केलं जातंय की अजून कशासाठी. आणखी वाचा Subscribe to Notifications