शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लढवा शक्कल, सापडेल उत्तर! पिझ्झा गोल मग बॉक्स चौकोनी का?; कारण ऐकून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 2:56 PM

1 / 7
पिझ्झा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पिझ्झा आवडत नाही असं म्हणणारे तर फार कमीच भेटतील. लहान मुलांच्या सर्वात जास्त आवडीचा असलेला पिझ्झा आता सर्वांनाच प्रचंड आवडतो. बर्थ डे पार्टी किंवा मग इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पिझ्झा हमखास ऑर्डर केला जातो.
2 / 7
आता तर घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर केल्यावर अवघ्या काही मिनिटांत तो उपलब्ध होतो. पिझ्झा हा वेगवेगळ्या साईजमध्ये असून त्यावर विविध गोष्टींच टॉपिंग्स केलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही पिझ्झा ऑर्डर करता तेव्हा तो नेहमी चौकोनी बॉक्समध्येच का पॅक केलेला असतो?
3 / 7
गोल आकार असलेला पिझ्झा हा नेहमीच चौकोनी बॉक्समध्ये का मिळतो? यामागे एक खास कारण आहे. खरतर याचे उत्तर तुम्हाला पिझ्झा बॉक्समध्येच मिळेल. चला तर मग यामागचं नेमकं कारण जाणून घेऊया... पिझ्झाचा आकार गोलाकार असला तरी त्याचे बॉक्स चौकोनी बनवले आहेत कारण चौकोनी आकाराचे बॉक्स बनवणं सोपं आहे.
4 / 7
पिझ्झासाठी खास गोल आकाराचे बॉक्स बनवण्यात खर्च आणि मेहनत जास्त असते. चौकोन आकाराचे बॉक्स कार्डबोर्डच्या फक्त एका शीटपासून बनवले जातात. तर एक गोल बॉक्स बनवण्यासाठी पुठ्ठ्याच्या एकापेक्षा जास्त शीटची आवश्यकता असते.
5 / 7
गोल बॉक्सेसच्या तुलनेत चौकोनी बॉक्स कोणत्य़ाही ठिकाणी ठेवणं अधिक सोयीचं आहे. स्क्वेअर बॉक्स फ्रीजपासून ओव्हनमध्ये सहज ठेवता येतात. कारण फ्रीज आणि ओव्हनचे कोपरे चौकोनी असतात. याशिवाय शेल्फचे कोपरेही चौकोनी असून येथेही चौकोनी बॉक्स अगदी नीट बसतात.
6 / 7
आता तुमच्या मनात असाही प्रश्न येत असेल की जर बॉक्सला गोल करता येत नाही तर पिझ्झा चौकोनी आकाराचा का बनवू नये? तर आम्ही तुम्हाला या मागचे कारणही सांगणार आहोत. गोल आकारात पिझ्झा बनवल्यास तो समान प्रमाणात पसरतो. याशिवाय तो गोलाकार असताना चारही बाजुने समान शिजतो. पिझ्झा कोणत्याही बाजूने कच्चा राहत नाही.
7 / 7
पिझ्झाच्या त्रिकोणी आकारात का कापला जातो? याचं उत्तरही अतिशय सोपं आहे की गोल वस्तू समान रीतीने कापण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचे लहान त्रिकोणांमध्ये कट करणे. पिझ्झाचा आकार खूप मोठा असेल तेव्हाच त्याचे तुकडे करता येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके