why tire color is black know the history and reason behind it
टायरचा रंग काळाच का असतो? इतर कोणत्याही रंगाचे टायर का नसतात? जाणून घ्या रंजक कारण By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 6:23 PM1 / 10आपल्या आजूबाजूला अनेक वाहान तुम्ही पाहिली असतील. यामध्ये कार, ट्रक, विमान आणि बस इत्यादी येतंच. त्याने तुम्ही प्रवास देखील केला असावा.2 / 10परंतू तुम्ही कधी या वाहानांच्या चाकांबद्दल विचार केलाय? गाडीचं चाक किंवा टायर हे गाडीच्या महत्वाच्या भागांपैकी एक आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही.3 / 10तसे पाहाता चाकांचा आकार आणि जाडी वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या वाहानांसाठी वेगवेगळे टायर लावले जातात.4 / 10गाड्यांच्या टायर्सचा रंग हा काळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का की टायर्सचा रंग काळाच असण्यामागचे कारण काय?5 / 10हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल की, १२५ वर्षांपूर्वी टायर्स पांढऱ्या रंगात बनवले जात होते. 6 / 10टायर्स तयार करण्यासाठी ज्या प्रकारच्या रबराचा वापर केला जातो, त्याचा रंग मिल्की व्हाईट असतो. परंतु तो पदार्थ एक ऑटोमोबाइलचा भार झेलू शकेल इतका मजबूतही नसतो आणि रोड्सवर उत्तम प्रकारे कामगिरी करु शकेल असाही नसतो.7 / 10यासाठीच मिल्की व्हाईट रबराला आणखी मजबूत करण्यासाठी काही पदार्थ एकत्र केले जातात. त्यात ब्लॅक कार्बनचा (Black Carbon) समावेश असतो.8 / 10यामुळे टायरचा रंग काळा होतो तसेच टायर मजबूत होतं आणि दिर्घकाळ टिकतं.9 / 10तसेच कार्बनमुळे ऑटोमोबाइल पार्ट्सच्या आतील गरमी कमी होते. यामुळेच जेव्हा रस्ते गरम असतात तेव्हा टायर्स वितळत नाहीत.10 / 10याशिवाय कार्बनमधील ब्लॅक सबस्टन्स टायर्सला युव्ही रेडिएशनपासूनही सुरक्षित ठेवतो. टायर्स मजबूत असणं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे टायर्स निवडताना ते किती मजबूत आहे, त्याचं लाइफ आणि विश्वासार्हता पडताळून पाहणं आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications