why vehicle tyre has pokes known as vent spews
गाडीच्या टायरला का असतात काटे? कधी विचार केलाय? ती डिझाईन नसून करतात 'ही' कामं By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 6:36 PM1 / 10आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याल अनेक गाड्या दिसतील आणि गाड्या म्हटलं की, टायर हे आलेच. गाड्यांचे टायर हे नेहमी काळ्या रंगाचे आणि रबराचे असल्याचे तुम्ही पाहिले असेल. 2 / 10या रबराच्या टायरकडे पाहिल्यावर बऱ्याचदा आपल्याला काटे दिसले असतील, परंतु आपण याकडे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणून पाहिले आहे.3 / 10तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कारण टायरवरील हे काटे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नाही तर ही टायरचे डिझाइन आहे.4 / 10पण मग प्रश्न असा उपस्थित रहातो की, असं डिझाइन कशासाठी? तर टायरवरील हे रबरी काट्यांना वेंट स्प्यूज म्हणतात.5 / 10हे काटे टायर्सची कार्यक्षमता सुधारण्यासाठी बनवले जातात.6 / 10सोप्या भाषेत समजून घ्यायचे झालं, तर गाडी चालू असताना टायरवर दबाव निर्माण होतो, तसेच टायरचे रोडवर घर्षण होते, त्यामुळे हा दबाव कमी करण्यासाठी हे काटे तयार केले जातात.7 / 10दुसरं कारण म्हणजे टायर बनवताना त्यात बुडबुडे तयार होण्याचा धोका असतो. हे अंतर्गतरित्या घडल्यास, टायर कमकुवत होऊ शकतात, म्हणून त्यांना असे काटे काढल्याने टायर कमकूवत होण्याचा धोका कमी होतो.8 / 10तसेच आपल्याला फक्त गोल टायर पाहायला मिळत नाही, त्यावर काही ना काही डिझाइन असते. मग हे डिझाइन का बनवले जाते? टायरमध्ये खाचे का असतात?9 / 10तर यामागचं कारण आहे गाडी स्लिप होऊ नये आणि कच्च्या तसेच वर खाली असलेल्या रस्त्यावरुन गाडी चालवणं सोपं होईल.10 / 10जर तुम्ही टायर विकत घेताना त्याला असे काटे दिसले किंवा असे जास्त खाच असलेले डिझाइन दिसले, तर समजा की तुमचा टायर दर्जेदार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी टायर विकत घेताना असा काटे असलेला टायर विकत घ्या, तो तुमच्यासाठी फायद्याचे देखील ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications