Why women and men also have extramarital affairs There are two different reasons for affairs
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 5:59 PM1 / 7खरे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे समाजिक पारंपरांच्या नियमांना धरून नाही. हे अयोग्यच मानले जाते. नव्हे अयोग्यच आहे. मात्र, अमेरिकेतील एका डेटिंग प्लॅटफॉर्मने याला एक यशस्वी बिझनेस मॉडेल बनवले आहे. 2 / 7ॲश्ले मॅडिसन (Ashley Madison) नावाची एक डेटिंग वेबसाइट खास विवाहित महिला व पुरुषांसाठी तयार करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म अशा लोकांना जोडण्याचे काम करतो, जे वैवाहिक आयुष्याबाहेर जाऊन प्रेम अथवा शारीरिक संबंधांच्या शोधात आहेत.3 / 7ॲश्ले मॅडिसनच्या प्रवक्त्या इसाबेला माईझ यांनी नुकतेच डेली स्टारसोबत बोलताना प्लॅटफॉर्मचे क्लाइंट्स आणि त्यांच्या गरजांसंदर्भात भाष्य केले आहे. 'विवाहित पुरुष आणि महिला, दोघेही त्यांच्या नात्याबाहेरील अफेअरच्या शोधतात येतात. मात्र त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, असे त्या म्हणाल्या.4 / 7इसाबेला यांच्या मते, अफेअरकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने बघितले जाते. मात्र, यामागे अनेकवेळा लोकांचा आपले नाते टिकवण्याचा हेतूही असतो. अफेअरचा अर्थ नाते तोडणे असा नाही. लोक याकडे शारीरिक आणि भावनात्मक आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही बघतात.5 / 7महिला आणि पुरुषांच्या अफेअरमागील कारणं वेगवेगळी - महिलांच्या अफेअरमागील कारणे पुरुषांच्या तुलनेत फार वेगळी आहेत, असे सांगत युनिव्हर्सिटी ऑफ मिसूरीच्या डॉ. ॲलिसिया वॉकर यांच्या स्टडीचा हवाला देत इसाबेला म्हणाल्या, 'नुकत्याच आललेल्या एका अहवालानुसार, आपण आपल्या साथिदाराला धोका दिला, असे अमेरिकेतील 16% लोकांना वाटते. असे असतानाही, जवळपास 47% अमेरिकन असे आहेत, जे धोका देणाऱ्या साथिदाराला क्षमा करण्यासाठी तयार आहेत.6 / 7Ashley Madison आणि काही इतर स्रोतांच्या माध्यमाने मिळवलेल्या माहितीनुसार, 67% यूजर्स आणि 30% अमेरिकन सहभागींनी शारीरिक समाधानाचा अभाव हे अफेअरचे सर्वात मोठे कारण सांगितले. तर, एकमेकांवरील प्रेम कमी होणे, हे अफेअरचे सर्वात छोटे सामान्य कारण असल्याचे आढळून आले.7 / 7आयुष्यात बॅलेन्स ठेवण्याचा प्रयत्न - इसाबेला यांच्या मते, लोक आता अफेअरकडे नात्याचा शेवट म्हणून बघत नाहीत. तर, याकडे आपल्या वैवाहिक आयुष्यातील अपूर्ण गरजा पूर्ण करण्याचे माध्यम मानतात. महत्वाचे म्हणजे, कोरोना काळात जेव्हा जोडपे सोबत अधिक वेळ घालवू लागले, तेव्हा या विचारात मोठा बदल झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications