wife alleges husband cheated her in ludo both reached police station kkg
CoronaVirus: नवरा लुडो खेळताना चीटिंग करतो; बायकोनं थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 4:15 PM1 / 10कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात टाळण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा केलं आहे.2 / 10घरात राहून कंटाळा येत असल्यानं वेळ घालण्यासाठी अनेक जण विविध बैठे खेळ खेळत आहेत. बरीचशी तरुण मुलं पबजी खेळत असताना मोठ्यांनी मात्र लुडोला पसंती दिली आहे. 3 / 10उत्तर प्रदेशातलं एक दाम्पत्य लुडो खेळत असताना त्यांच्यात वाद झाला. हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.4 / 10फर्रुखाबादमध्ये राहणारे पती पत्नी लुडो खेळत होते. पाच महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे.5 / 10पती शेतकरी असल्यानं सध्या त्याला फारशी कामं नाहीत. त्यामुळे तो वेळ घालवण्यासाठी पत्नीसोबत लुडो खेळत होता.6 / 10लुडो खेळत असताना दोघांमध्ये वाद झाला. पती फसवणूक करत असल्याचा आरोप पत्नीनं केला. 7 / 10वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नीनं थेट पोलिसांना फोन केला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पती पत्नीला पोलीस ठाण्यात आणलं गेलं. 8 / 10लुडो खेळताना फसवणूक करत असल्याचा आरोप दोघांनी एकमेकांवर पोलिसांसमोर केला. 9 / 10त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत घातली आणि भांडण मिटवलं. त्यानंतर पती पत्नी घरी गेले.10 / 10मेरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विचित्र घटना घडली. ती पाहून पोलीस काही काळ चक्रावून गेले. आणखी वाचा Subscribe to Notifications