अंडरविअरमुळे उघड झालं अफेअरचं रहस्य, महिलेला चीट करत होता तिचा पती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:14 IST
1 / 9प्रेमात दगा मिळाल्यावर अर्थातच कुणालाही दु:खं होतं आणि अशात पती जर पत्नीला दगा देत असेल तर महिलेला जास्त दु:खं होतं. अशाच एका महिलेने तिचा अनुभव जगाला सांगितला. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीचं त्याच्या असिस्टंटसोबत अफेअर सुरू होतं आणि तो मला चीट करत होता. 2 / 9'डेली स्टार' च्या वृत्तानुसार, महिलेने सांगितलं की, तो माझ्या शेजारी बसून त्या महिलेला मेसेज करत होता आणि विचारलं तर सांगायचा की, तो एका तरूणीसोबत बोलत आहे.3 / 9महिलेचं वय साधारण ३८ वर्षे आहे तर तिच्या पतीचं वय ४२ वर्षे आहे. दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झालीत. तरीही तिचा पती आपल्या पत्नीला चीट करत आहे. 4 / 9महिलेने सांगितलं की, घरातील कामात पतीने कधीच तिची मदत केली नाही. इतकंच नाही तर घरातील सगळी कामं तिच करत होती. बेडरूममध्येही त्याचीच मर्जी चालत होती आणि त्याच्या हिशेबाने तो माझा वापर करत होता. 5 / 9महिलेने पुढे सांगितलं की, त्याने कधीच मला बेडवर संतुष्ट केलं नाही. नेहमीच विचारल्यावर कारण देत होता की, ऑफिसच्या कामामुळे तो थकला आहे. 6 / 9महिलेने सांगितलं की, अलिकडे तिचा पती तिचा फार राग करू लागला होता. तो नेहमीच माझ्या कपड्यांबाबत नाखूश राहत होता. इतकंच काय तर माझ्या प्रत्येक कामातून त्याला समस्या होती. पण मला एका व्यक्तीने एक सल्ला दिला ज्याची मला फार मदत झाली.7 / 9महिलेने सांगितलं की, आपल्या पतीचे कपड धुताना मला त्याच्या पॅंटच्या खिशात एका ब्राइट पिंक कलरची अंडरविअर सापडली. पण मला धक्का बसला आणि जुने दिवस आठवले. आपल्या तरूणपणी माझा पती तरूणींपासून दूर पळत होता आणि त्याला कधीही गर्लफ्रेन्ड नव्हती.8 / 9महिलेने या घटनेनंतर पतीला काहीच विचारलं नाही, ना त्या अंडरविअरबाबत विचारलं. पण नंतर समजलं की, ती अंडरविअर त्याच्या असिस्टंटची होती. महिलेने सांगितलं की, माझा पती मला पागल समजतो आणि त्याला याचं अजिबात वाईट वाटत नाही की, त्याचं त्याच्या २३ वर्षीय असिस्टंटसोबत अफेअर आहे. महिला म्हणाली की, मला हे सगळं विसरायचं होतं. पण नंतर विचार केला की, या सर्वामुळे आमच्या मुलाला समस्यांचा सामना करावा लागेल.9 / 9यानंतर महिलेला डिअर डिड्रेकडून सल्ला देण्यात आला की, मुलासोबतच तुमची मेंटल हेल्थही गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीसोबत बोललं पाहिजे आणि त्या अंडरविअरबाबत विचारलं पाहिजे. तसेच पतीला सांगा की, त्याचं हे वागणं घरात चालणार नाही.