A woman in America was told that her shorts were too short and she was banned coming to the park
छोट्या कपड्यांमुळे महिलेसोबत पार्कमध्ये गैरवर्तन, पाच वर्षांसाठी घातली तिच्यावर बंदी By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:43 AM1 / 10अमेरिकेतील कोलोराडो शहरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या शॉर्ट्समुळे मानसिक अत्याचाराचा सामना करावा लागला. बेली ब्रीडलव नावाची ही महिला एका थीम पार्कमध्ये बसली होती. इथे काही सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी तिला तिचे शॉर्ट्स खूप लहान असल्याचे सांगितले आणि तिला नवीन शॉर्ट्स खरेदी करण्याचा सल्लाही दिला. 2 / 10याबाबत तिने फेसबुकवर पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट व्हायरल झाली आहे. तिने लिहिले की, काही दिवसांपूर्वी आम्ही ओकलेहोमा सिटीमध्ये गेलो होतो. आम्हाला वाटलं होतं की, कोरोनामुळे आम्ही बऱ्याच दिवसांपासून घराबाहेर निघालो नाही. तर सहज बाहेर पडलो. आम्हाला वाटलं आम्ही कोविड गाइडलाईन फॉलो करत या ठिकाणी मस्ती करू, पण आमचा अनुभव फारच वाईट ठरला.3 / 10बेलीने पुढे लिहिले की, ओकलेहामा शहरातील एका थीम पार्कमध्ये ती सायंकाळी ५ वाजता आली होती. इथे येण्यासाठी मी तिकीट आणि पार्किंगसाठी जास्त पैसे दिले होते. आम्ही सायंकाळी पाच वाजता पोहोचलो. आमचं चांगलं स्वागत करण्यात आलं होतं. पण सायंकाळी ७ वाजता आमच्यासोबत दुर्व्यवहार झाला. 4 / 10तिने लिहिले की, अचानक सायंकाळी ७ वाजता सिक्युरिटी गार्ड माझ्या मुलीवर ओरडू लागला. कारण ती तिथे उड्या मारत मस्ती करत होती. त्यानंतर गार्ड माझ्याकडे आला आणि माझा हात त्याने पकडला. मला म्हणाला की, माझे शॉर्ट्स फार छोटे आहेत. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या बॉयफ्रेन्डकडे जाऊ लागली.5 / 10बेली म्हणाली की, मला ऑटिज्मी समस्या आहे. मला त्या लोकांसोबत ठीकपणे बोलता येत नव्हतं. यानंतर ती महिला अधिकारी माझ्यावर ओरडू लागली आणि बॅकअपसाठी लोकांना बोलवू लागली. त्यानंतर तिथे पार्कचा मॅनेजर पोहोचला. त्याने मला नवीन शॉर्ट्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तर मी नकार दिला.6 / 10बेलीने लिहिले की, मला पार्कमध्ये बेकायदेशीरपणे शिरल्या प्रकरणी ते धमकी देत होते. त्यामुळे मी नवीन शॉर्ट्स घेण्यास होकार दिला. कारण मला चांगला मूड खराब करायचा नव्हता. पण त्यानंतर मला धक्का दिला गेला आणि पार्कच्या प्रवेश द्वाराजवळ नेण्यात आलं. नंतर माझं आयडी मागितलं. माझी मुलगी हे सगळं बघून हैराण झाली. 7 / 10तिने पोस्टमध्ये लिहिले की, हे २०२१ वर्ष आहे आणि मला अशाप्रकारे बॉडीशेम करण्याची काहीच गरज नव्हती. मी याप्रकरणी पोलिसात जाणार. इतकं सगळं झाल्यावर पार्कने माझ्यावर ५ वर्षांची बंदी घातली. 8 / 10तिने पोस्टमध्ये लिहिले की, हे २०२१ वर्ष आहे आणि मला अशाप्रकारे बॉडीशेम करण्याची काहीच गरज नव्हती. मी याप्रकरणी पोलिसात जाणार. इतकं सगळं झाल्यावर पार्कने माझ्यावर ५ वर्षांची बंदी घातली. 9 / 10तिने पोस्टमध्ये लिहिले की, हे २०२१ वर्ष आहे आणि मला अशाप्रकारे बॉडीशेम करण्याची काहीच गरज नव्हती. मी याप्रकरणी पोलिसात जाणार. इतकं सगळं झाल्यावर पार्कने माझ्यावर ५ वर्षांची बंदी घातली. 10 / 10तिने पोस्टमध्ये लिहिले की, हे २०२१ वर्ष आहे आणि मला अशाप्रकारे बॉडीशेम करण्याची काहीच गरज नव्हती. मी याप्रकरणी पोलिसात जाणार. इतकं सगळं झाल्यावर पार्कने माझ्यावर ५ वर्षांची बंदी घातली. आणखी वाचा Subscribe to Notifications