woman celebrates divorce with photoshoot burning wedding gown tearing photo goes viral
घटस्फोटाचं दणक्यात सेलिब्रेशन! ‘तिने’ लग्नाचा गाऊन जाळला, फोटो फाडले अन् साजरा केला आनंद By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:16 PM1 / 11प्रत्येकजण आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो, मात्र एक महिला तिच्या घटस्फोटाशी संबंधित फोटो शेअर करून जोरदार चर्चेत आली आहे. एखाद्याशी लग्न करणे आणि नंतर घटस्फोट घेणे हे सामान्यतः दुःखी मानले जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महिलेने फोटोशूट करून घटस्फोट साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2 / 11लॉरेन ब्रूकचे जे फोटो समोर आले आहेत ते लोकांना खूप जास्त आवडत आहेत आणि गुदमरून जगत राहण्याऐवजी लग्नातून बाहेर पडण्याच्या महिलेच्या अनोख्या शैलीचं लोक कौतुक करत आहेत.3 / 11लाल गाऊन परिधान केलेल्या घटस्फोटाचा उत्सव साजरा करणाऱ्या महिलेच्या पहिल्या फोटोत ती घटस्फोट लिहिलेली दोरी हातात धरून हसत आहे. दुसऱ्या फोटोत ती तिचा लग्नाचा गाऊन जाळत आहे.4 / 11लॉरेन शॅम्पेनची बाटली उघडत आहे तसेच ती तिच्या लग्नाचा ड्रेस तिच्या पायाखाली ठेवते. याशिवाय ती तिच्या लग्नाच्या फोटोंना सँडलच्या टाचांनी चिरडताना दिसत आहे. चौथ्या फोटोत ती लग्नाचा फोटो मधूनच फाडून टाकत आहे.5 / 11एका फोटोत महिलेने हातात एक फलक धरला आहे, ज्यावर तिने एक मेसेज लिहिला आहे. प्रत्येक फोटोत महिला खूप आनंदी दिसत असून तुटलेल्या नात्याची खिल्ली उडवताना दिसत आहे.6 / 11या महिलेच्या फोटोंवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की मला खात्री आहे की तिला यातून खूप स्वातंत्र्य मिळत असल्याचं वाटत असेल. लॉरेनच्या पतीबद्दल अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली असली तरी, कदाचित हे सर्व पाहून त्यांना वाईट वाटेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. 7 / 11एकाने लिहिले की हे स्त्रीसाठी खूप जास्त चांगले आहे. कदाचित ती तिच्या जुन्या नात्यात खूप नाखूश होती. आशा आहे की महिला आता आनंदी आहे आणि पूर्वीपेक्षा चांगल्या ठिकाणी आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)8 / 11टॉक्सिक वैवाहिक जीवनात राहण्यापेक्षा घटस्फोट घेऊन उत्सव साजरा करणे चांगले आहे, अशी कमेंट देखील आणखी एका युजरने केली आहे. सध्या महिलेचं हे फोटोशूट जोरदार चर्चेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 11टॉक्सिक वैवाहिक जीवनात राहण्यापेक्षा घटस्फोट घेऊन उत्सव साजरा करणे चांगले आहे, अशी कमेंट देखील आणखी एका युजरने केली आहे. सध्या महिलेचं हे फोटोशूट जोरदार चर्चेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 11टॉक्सिक वैवाहिक जीवनात राहण्यापेक्षा घटस्फोट घेऊन उत्सव साजरा करणे चांगले आहे, अशी कमेंट देखील आणखी एका युजरने केली आहे. सध्या महिलेचं हे फोटोशूट जोरदार चर्चेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 11टॉक्सिक वैवाहिक जीवनात राहण्यापेक्षा घटस्फोट घेऊन उत्सव साजरा करणे चांगले आहे, अशी कमेंट देखील आणखी एका युजरने केली आहे. सध्या महिलेचं हे फोटोशूट जोरदार चर्चेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications