The woman had to ignore the common marks on her nails
महिलेला नखावरील सामान्य निशाणाकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात, निघाला दुर्मिळ कॅन्सर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 5:46 PM1 / 10तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे ब्रिटनमधील अशाच एका महिलेला तिच्या नखांवर उमटलेल्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ज्याचे फळ तिला भोगावे लागले.2 / 10एलेना सेवेर्स नावाच्या या महिलेने तीन वर्ष तिच्या नखावरील निशाण लाल नेलपॉलिशने लपवले.3 / 10 ३६ वर्षाच्या एलेनाला तिच्या नखावर असलेल्या निशाणामुळे फार लाज वाटायची. त्यानंतर तिने एक लेख वाचला आणि तिचा त्या निशाणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तिला वाटले की हे गंभीर असू शकते.4 / 10त्यानंतर ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिला बायोस्पी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना असे आढळले कि तिला मेलानोमा आहे. 5 / 10मेलोनामा हा एक प्रकारचा त्वचेचा कॅन्सर आहे आणि तो दुर्मिळ आहे.6 / 10पोस्टमार्थच्या क्विन अलॅक्झेंडर रुग्णालयात तिचं निशाण असलेलं अंगठ्याचं नख हटवण्यात आलं. त्याचबरोबर डॉक्टरांनी तेथील ५ मिमी पर्यंतचे कॅन्सरचे टिश्युसही काढून टाकले. 7 / 10एलेना आता खुश आहे की आता तिच्या शरीरात कॅन्सरचा फैलाव रोखला गेला आहे.8 / 10हैंपशायरला राहणारी एलेना सांगते कि तिने लाल नेलपॉलिश लावून तिच्या नखावरील ते निशाण लपवलं. पण कॉस्मोपॉलिटिएन मॅग्झीन वाचल्यानंतर तिला धक्काच बसला.9 / 10तिने म्हटलं कि त्या मॅग्झीनमध्ये पाहिल्यानंतर तिथे जसा दाखवलेला तसाच निशाण माझ्या नखावर होता. म्हणून मी लगेच त्याचा फोटो काढुन माझ्या पार्टनरला पाठवला. 10 / 10तेव्हा मला समजले की या निशाणाकडे दुर्लक्ष करून मी किती मोठी चूक करत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications