A woman from South Africa gave birth to ten children and boyfriend says he does not believe it
कहाणी में ट्विस्ट! गर्लफ्रेन्डचा १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, बॉयफ्रेन्ड म्हणाला - 'यावर माझा विश्वास नाही' By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:03 PM1 / 8काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील महिला गोसियामी धमारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. कारण तिने एकत्र १० बाळांना जन्म देऊन रेकॉर्ड कायम केल्याचा दावा केला जात होता. पण आता या कहाणीत ट्विस्ट बघायला मिळत आहे. आता या महिलेच्या बॉयफ्रेन्डने सांगितलं की, त्याला या गोष्टीवर विश्वासच नाही की, त्याच्या गर्लफ्रेन्डने १० बाळांना एकत्र जन्म दिला.2 / 8दक्षिण आफ्रिकेतील मीडियानुसार, ३७ वर्षीय गोसियामीने आपल्या बॉयफ्रेन्डला सांगितलं होतं की, ८ जून रोजी तिची डिलीव्हरी झाली होती. बॉयफ्रेन्ड तेबोगो अजून गोसियामीला भेटलेला नाही. त्याच्या परिवाराने सांगितलं की,, अनेक प्रयत्न करूनही तेबोगो आपल्या गर्लफ्रेन्डला भेटू शकत नाहीये.3 / 8या परिवाराचा दावा आहे की, गोसियामी ना तिचं लोकेशन सांगत आहे, ना बाळांबाबत काही सांगत आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही की गोसियामीने १० बाळांना जन्म दिलाय. आमचं तिच्यासोबत केवळ फोन-मेसेजवर बोलणं होतं. 4 / 8याआधी गोसियामीच्या बॉयफ्रेन्डने लोकांना आवाहन केलं होतं की, त्यांनी गोसियामीला पैसे डोनेट करू नये. प्रीटोरिया न्यूजच्या रिपोर्टनुसार, तेबोगो म्हणाला होता की, मला खरंच आभारी आहे की, इतके लोक आमच्या मदतीसाठी समोर आले आणि आम्हाला आर्थिक मदत करत आहेत.5 / 8तो पुढे म्हणाला होता की, मी लोकांना विनंती करतो की, जोपर्यंत या बाळांना आमच्या परिवारातील आणि समुदायातील लोक बघत नाहीत तोपर्यंत कुणी डोनेशन करू नका. त्यासोबतच गोसियामीने कोणत्या हॉस्पिलमध्ये बाळांना जन्म दिला याबाबतही संशय कायम आहे.6 / 8आश्चर्याची बाब म्हणजे गोसियामीच्या बॉयफ्रेन्डनेच सर्वातआधी मीडियाला सांगितलं होतं की, त्याच्या गर्लफ्रेन्डने १० बाळांना जन्म दिलाय. तो म्हणाला होता की, ५ बाळांचा जन्म नॉर्मल आणि ५ बाळांचा जन्म सी-सेक्शनने झाला. ही बाळं प्री-मेच्योर आहे आणि तो या घटनेने फार भावूक झालाय. पण आता त्याने गर्लफ्रेन्डबाबत संशय व्यक्त केलाय.7 / 8तेच डिपार्टमेंट ऑफ सोशल डेव्हलपमेंटचे प्रवक्ता फेजीवे ड्वायाना हे ही घटना व्हायरल झाल्यावर म्हणाले होते की, याचं कन्फर्मेशन देऊ शकत नाही की, या महिलेने एकत्र १० बाळांना जन्म दिलाय. कारण ही महिला कुणाच्याही संपर्कात नाही. ते म्हणाले की, कन्फर्मेशनसाठी एका सोशल वर्करला गोसियामीच्या घरी पाठवण्यात आलं आहे.8 / 8दरम्यान, गोसियामीआधी एकाच वेळी सर्वात जास्त बाळांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोरक्कोमध्ये राहणाऱ्या हलीमा सिसीच्या नावावर होता. तिने एका वेळी ९ बाळांना जन्म दिला होता. तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं. पण गोसियामीच्या प्रेग्नेन्सीनंतर असं मानलं जात होतं की, तिने हलीमाचा रेकॉर्ड तोडला. पण या रेकॉर्डबाबत अजूनही सस्पेस कायम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications