Woman tells why in laws are no longer speaking to her
बालिशपणा कहर! सासूने सुनेच्या फेसबुकवर केली अशी कमेंट की नातंच तुटलं.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 9:28 AM1 / 11 एका महिलेने एका पोर्टलवर तिचे सासू-सासरे तिच्यावर नाजार असण्याचं विचित्र कारण सांगितलं आहे. हे कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल. महिलेने लिहिले की, माझे सासू-सासरे दोघेही फार चांगले आहेत. पण सोशल मीडियावर त्यांचं माझ्यासोबतचं वागणं फारच विचित्र होतं. (All Image Credit - Google)2 / 11महिलेने लिहिले की, 'माझे सासू-सासरे फेसबुकवर माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये होते आणि माझ्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करत होते. जर मी माझ्या मुलाला एखादा फोटो शेअर केला तर ते खूप प्रशंसा करत होते. पण जेव्हा मी माझा माझ्या मित्र-मैत्रीणींसोबतचा फोटो पोस्ट केला तर त्यावर मला लाजिरवाण्या कमेंट करत होते'.3 / 11महिलेने लिहिले की, 'मी अजून ४० वर्षांचीही झाले नाही आणि ६ वर्षांपर्यंत मला हवे ते कपडे मी घालू शकते. पण माझे सासू-सासरे माझ्या फोटोंवर विचित्र कमेंट करत होते. माझ्या एका फोटोवर माझ्या सासऱ्यांनी कमेंट केली की, आशा आहे की, तुझी मुलं तुला या स्थितीत बघत नसतील. त्यांना म्हणायचं होतं की, मी त्या फोटोत नशेत होते'.4 / 11तिने लिहिले की, माझ्या पोस्ट्सवर सासू-सासऱ्यांच्या या नेहमीच्या कमेंट्सना हैराण होऊन मी त्यांना अनफ्रेन्ड केलं. त्यामुळे दोघेही माझ्यावर नाराज झालेत.5 / 11महिलेने लिहिले की, 'माझ्या सासूने मला मेसेज करून विचारले की, मी त्यांना अनफ्रेन्ड का केलं. मी त्यांना फोन करून स्पष्ट स्पष्ट सांगितलं की, मला त्यांच्या काही कमेंट्स फारच अपमानजनक वाटतात आणि मला माझं सोशल मीडिया अकाउंट केवळ मित्रांपर्यंत सीमित ठेवायचं आहे. सासूने ही बाब सासऱ्यांना सांगितली आणि दोघांनीही माझ्यासोबत बोलणं बंद केलं'.6 / 11महिलेने लिहिले की, माझ्या पतीने माझी बाजू घेत आपल्या आई-वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि सांगितले की, अनफ्रेन्ड करण्यासाठी ते मला काहीच म्हणू शकत नाहीत. कारण सामान्यपणे माझ्या वयाच्या महिलांच्या सोशल मीडिया फ्रेन्ड्समध्ये त्यांचे सासू-सासरे राहत नाहीत. मी केवळ विन्रमता दाखवत त्यांना अॅड केलं होतं.7 / 11पुढे तिने लिहिले की, 'ते लोक टीनएजर्ससारखे व्यवहार करतात. मला आधीही काही लोकांना अनफ्रेन्ड केलंय. मला याचा फरक पडत नाही. आता माझे पती मुलांना घेऊन त्यांच्याकडे जातात पण मला बोलवलं जात नाही. पण मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण हे फार हास्यास्पद आहे'.8 / 11महिला म्हणाली की आता माझे सासू-सासरे तेव्हाच नॉर्मल होतील जेव्हा मी त्यांना फ्रेन्ड लिस्टमध्ये सामिल करून घेईल. पण मी हे का करू? मला वाटतं ७० व्या वयातील लोकांना आपल्या आरोग्याबाबत जास्त चिंता केली पाहिजे. त्यांनी सूनेच्या फेसबुक पेजबाबत जास्त विचार करू नये'.9 / 11'माझ्या मुलाने मला एक दिवस विचारलं की, त्याच्या आजी-आजोबा आता माझ्यासोबत का बोलत नाहीत? आधी मला वाटलं की, त्याला दुसरंच काहीतरी सांगायला पाहिजे. पण नंतर विचार केला की, त्याला सत्य सांगावं. मी त्याला सांगितलं की, आजी-आजोबा यामुळे नाराज आहे कारण त्यांना माझे फेसबुक पोस्ट बघायला मिळत नाही. माझा १० वर्षांचा मुलगा म्हणाला की, ही तर फारच विचित्र बाब आहे'.10 / 11महिलेने लिहिले की, 'मला आशा आहे की, ते हा बालिशपणा सोडतील आणि हा विषय संपवतील. मला वाटतं, मलाच पुढे येऊन हे प्रकरण सोडवायला हवं. मी त्यांना फेसबुकवर तर अॅड करणार नाही. पण फोनवर बोलून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन'.11 / 11महिलेने शेवटी लिहिले की, 'मी विचार केला आहे की, मी त्यांना माझ्या दुसऱ्या फेसबुक अकाउंटच्या फ्रेन्ड लिस्टमध्ये अॅड करणार. कारण त्या अकाउंटचा वापर मी फार कमी करते. यामुळे त्यांना पुन्हा एकदा आनंद मिळेल. मला असं वाटतं की, त्यांनी आता हा बालिशपणा सोडला पाहिजे'. आणखी वाचा Subscribe to Notifications