शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोंबला! 35 वर्षीय तरूणाचा ८० वर्षांच्या आजीवर जीव जडला; अन् फेसबुकवर जमलेल्या प्रेमासाठी आजीने धर्मच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 6:39 PM

1 / 8
प्रेमाला वयाचं बंधन नसतं. या वाक्याचा प्रत्यय येईल अशी अनेक उदाहरण तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. सध्या अनेक रिलेशनशिप्स सोशल मीडियापासून सुरू होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हटके प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका ३५ वर्षीय माणसाला ८० वर्षांच्या आजीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम झालं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पैसे किंवा संपत्ती याचा आमच्या प्रेमाशी काहीही संबंध नाही. आमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. महिलेनं असं सांगितल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
2 / 8
मागच्या वर्षी मोहाम्मद अहमद इब्राहिम या ३५ वर्षीय पुरूषाची ओळख ८० वर्षांच्या आयरिस जोंस यांच्याशी फेसबूकच्या माध्यमातून झाली. मोहाम्मद हे इजिप्तचे रहिवासी असून आयरिस या ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत. मोहाम्मदशी ओळख झाल्यानंतर मोहाम्मद ला भेटण्यासाठी आयरिस इजिप्तला जाऊन पोहोचल्या.
3 / 8
यावर्षी एका टिव्ही शोव्ह मध्ये आयरिश यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले होते. त्यांनी सांगितेल की. अनेक वर्षांनी मला माझ्या लैगिंक जीवनात संतुष्टी मिळाली. अल वतनच्या रिपोर्टनुसार या कपल्सनी एकमेकांशी लग्न केलं आहे. मोहाम्मदने सांगितले की, लग्न झाल्यानंतरही आयरिशला ना पैसे हवेत ना मला ब्रिटनचे नागरिकत्व.
4 / 8
हे लग्न इजिप्तमध्ये झाले असून आयरिशने धर्म बदलून इस्लामचा स्विकार केला आहे. या दोघांनी आपल्या लग्नाबद्दल खूप गुप्तता पाळली.
5 / 8
मोहम्मदने सांगितले की, ''फेसबुकवर प्रेम झाल्यानंतर जेव्हा आयरिश मला भेटण्यासाठी इजिप्तला पोहोचल्या तेव्हा मला जाणवलं की, त्यांचे माझ्यावर खरं प्रेम आहे. त्यामुळे मी खूप नशिबवान आहे.''
6 / 8
मोहाम्मद इजिप्तच्या कैरो शहरात राहत असून आधी वेल्डींग इन्स्पेक्टरचा जॉब करत होता. आयरिश इजिप्तला आल्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली. आता मोहाम्मद आयरिश त्यांना घेऊन आपल्या कुटूंबियांसोबत राहत आहे.
7 / 8
आयरिश आधी ब्रिटनमध्ये राहत असून त्यांना १९ हजार ५०० रुपये सरकारी भत्ता मिळत होता. आयरिश यांचा दोन कोंटींचा बंगला आहे. आयरिश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आता नेहमीच मोहाम्मद सोबत राहायचं आहे.
8 / 8
आयरिश आधी ब्रिटनमध्ये राहत असून त्यांना १९ हजार ५०० रुपये सरकारी भत्ता मिळत होता. आयरिश यांचा दोन कोंटींचा बंगला आहे. आयरिश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आता नेहमीच मोहाम्मद सोबत राहायचं आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFacebookफेसबुकSocial Viralसोशल व्हायरल