शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाइमपाससाठी महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकिट अन् बनली करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 5:56 PM

1 / 8
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका महिलेची फ्लाइट कॅन्सल झाली आणि तिच्यासाठी ती नशिबवान ठरली. कारण, तिने जवळपास 8 कोटींची लॉटरी जिंकली. लॉटरीद्वारे कोट्यावधी बनलेल्या या महिलेने सांगितले की, तिला स्वप्नातही असे वाटले नव्हते.
2 / 8
फ्लोरिडामध्ये या महिलेने एक मिलियन डॉलर्सची लॉटरी जॅकपॉट जिंकली. या महिलेने असा दावा केला आहे की, तिची फ्लाइट अनपेक्षितरित्या रद्द झाली नसती तर तिने कधी लॉटरीचे तिकिट खरेदी केले नसते.
3 / 8
कॅनसस सिटीमध्ये राहणाऱ्या 51 वर्षीय अँजेला कारवेला यांनी फ्लोरिडा लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ फ्लोरिडामध्ये घालवला. कारण त्यांची फ्लाइट रद्द झाली होती.
4 / 8
दरम्यान, अँजेला कारवेला यांनी टाइमपास करण्यासाठी काही स्क्रॅच ऑफ लॉटरी तिकिटे खरेदी केली.
5 / 8
'माझी फ्लाइट अनक्षेपितपणे रद्द झाल्यानंतर काहीतरी अजब घडणार आहे, असे मला वाटत होते', असे अँजेला कारवेला म्हणाल्या.
6 / 8
त्या म्हणाल्या, 'मी टाइमपास करण्यासाठी काही स्क्रॅच ऑफ तिकिटे खरेदी केली आणि त्यानंतर मी दहा लाख डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 43 लाख 70 हजार 50 रुपये जिंकले.'
7 / 8
अँजेला कारवेला यांनी द फास्टेस्ट रोडवरील ब्रँडनमधील पब्लिक स्टोअरमधून खरेदी केलेल्या 1,000,000 डॉलरच्या स्क्रॅच-ऑफ तिकिटावर अव्वल पुरस्कार मिळविला.
8 / 8
लॉटरी जिंकणाऱ्या अँजेला कारवेला यांनी तल्हासी येथील लॉटरी मुख्यालयाला भेट दिली आणि जिंकलेली रक्कम एकाचवेळी घेण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :Americaअमेरिका