शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकेकाळी अफगाणिस्तानच्या स्त्रिया होत्या खूप मॉर्डन, स्टाईल आणि फॅशनची राजधानी होती काबूल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:49 PM

1 / 10
अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर तालिबान्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळाले आहेत. अफगाणिस्तानातील जनता आता भीतीच्या सावटाखाली आहे.
2 / 10
अफगाणिस्तानमधीन जनता येथुन पळण्याचा प्रयत्न करते आहे कारण महिलांवर येणारी अमानुष बंधने.महिलांना केवळ घरातून बाहेर पडण्यावरच बंदी नव्हती तर नोकरी करणेही अमान्य होते. बुरखा न घातल्यास त्यांना सर्वांच्यादेखत मारहाण केली जायची.
3 / 10
मात्र काही दशकांपूर्वी अफगाणिस्थानमध्ये परिस्थीती वेगळी होती. अफगाणिस्तानच्या संस्कृतीत आधुनिकीकरणाचा मिलाफ पाहायला मिळत होता.
4 / 10
अमेरिकेचे नागरिक आणि डॉक्टर बिल पोडलिच त्यांच्या दोन मुली व पत्नीसमवेत १९६७ साली अफगाणिस्तानात आले होते. तेव्हा त्यांना अफगाणिस्तानच्या संस्कृतीचं फार कौतुक वाटलं होतं. त्यांनी अफगाणिस्तानातील लाफईस्टाईलचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.
5 / 10
त्याकाळी बिल अफगाणिस्तानमध्ये हायर टिचर्स कॉलेजमध्ये शिकवत. तर त्यांच्या मुली काबुलमधीलच अमेरिकन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत होत्या. त्यांच्यासोबत अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शाळेत शिकत. ते तिथे कामही करत होते. बिल कॉलेजमध्ये २ वर्ष शिकवायला होते.
6 / 10
या शिवाय सॅन जोस युनिवर्सिटीचे इंजिनियरिंगचे प्राध्यापक मोहम्मह हुमायुं कयुमी यांनीही अफगाणिस्तानच्या तत्कालीन लाईफस्टाईसचे फोटो काढले होते. त्यांच्या 'वन्स अपॉन अ टाईम इन अफगाणिस्तान' या फोटो एसे बुकमध्ये त्याकाळातील आधुनिक अफगाणिस्तानचे फोटो आहेत
7 / 10
या पुस्तकामध्ये ६०-७० दशकातील अफगाणिस्तानमधील महिलांचे फोटो आहेत. ज्यात महिला शॉर्ट स्कर्ट घालु शकत होत्या. महिलांवर कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती.
8 / 10
त्याकाळी महिला रस्त्यावर कोणतीही भीती न बाळगता फिरु शकत होत्या. विद्यापीठांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत होत्या. तो काळ स्त्रियांसाठी बंधनमुक्त होता.
9 / 10
साल २००१ मध्ये ब्युरो ऑफ डेमोक्रसी, ह्युमन राईट्स अँड लेबरच्या स्टेट डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार १९२० साली महिलांना मतदान देण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यावेळी संविधानाने महिलांना समान दर्जा दिला होता.
10 / 10
७०च्या दशकात ७० टक्के महिला शिक्षिका होत्या. ५० टक्के सरकारी कर्मचारी महिला होत्या आणि ४० टक्के डॉक्टरसही महिला होत्या. मात्र १९९० नंतर सर्व परिस्थीती बदलली.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेfashionफॅशनAfghanistanअफगाणिस्तान