Women demands beer in quarantine centre in Moradabad api
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांकडून बीअरची डिमांड; आधी धिंगाणा, नंतर अंगावरचे कपडेच काढले! By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 4:11 PM1 / 9कोरोना व्हायरसच्या संशयित रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या काही क्वारंटाईन सेंटर्स फारच विचित्र घटना समोर येत आहेत. काही सेंटर्समध्ये रूग्णांकडून तर अशी डिमांड केली जात आहे की, अधिकारीही हैराण झाले आहेत. पण मुरादाबादमध्ये केल्या गेलेल्या डिमांडने तर सीमाच ओलांडली आहे. 2 / 9नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुरादाबादच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या मुंबईहून आलेल्या महिलांनी मंगळवारी सायंकाळी थेट बीअरची डिमांड केली. इतकेच नाही तर बीअर मिळाली नाही म्हणून त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. 3 / 9सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने तिच्या तीन वर्षाच्या बाळाला बाल्कनीत लटकवलं. त्याला खाली फेकण्याची धमकीही देऊन डिमांड पूर्ण करवून घेण्याचा प्रयत्न केला. 4 / 9इतकेच नाही तर सगळ्या सीमा ओलांडत या महिलांनी बीअर मिळावी म्हणून शरीरावरील सर्व कपडे काढले आणि डान्स करू लागल्या. महिला पोलिसांना तिथे पाठवून त्यांना समजावण्यात आलं. (सांकेतिक छायाचित्र) 5 / 9पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयटीला क्वारंटाईन सेंटर केलं आहे. त्यात मुंबईहून मुरादाबादच्या आदर्श कॉलनीत आलेल्या महिलांना ठेवण्यात आलं आहे. मुंबईहून आलेल्या 72 लोकांमध्ये 12 लहान मुले, 40 महिला आणि 20 पुरूष आहेत. (प्रातिनिधीक छायाचित्र)6 / 9यातील 20 जणांची कोरोनाची टेस्ट केली गेली आणि 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. मग पाचऐवजी सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात आलं. 7 / 9पोलिसांनी माहिती दिली की, या महिला आधी क्वारंटाईन सेंटरला जाण्यास तयार नव्हत्या. मोठ्या मुश्कीलीने त्यांना तिथे ठेवण्यात आलंय. सायंकाळी त्यांनी धिंगाणा घालणं सुरू केलं. (साांकेतिक छायाचित्र)8 / 9मेडिकल स्टाफच्या महिलांकडे त्या बीअरची मागणी करू लागल्या. सध्या इथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या लोकांपैकी 15 निगेटीव्ह लोकांना रात्री उशीरा एमआयटीच्या गर्ल्स होस्टेलमध्ये शिफ्ट केलं. 9 / 9असे सांगितले जात आहे की, या महिलांमधील अनेक महिला बार डान्सर आहेत. याआधी मेरठमधील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये म्युझिक आणि टीव्ही लावण्याची मागणी करण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications