शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६८२ डब्बे असलेली जगातील एकमेव ट्रेन; लांबी आणि वजन पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:06 PM

1 / 6
World Longest Train: भारतासह अनेक देशांमध्ये दररोज अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. मात्र, तुम्ही अशा ट्रेनचे कोच म्हणजेच डब्बे मोजण्याचा कधी प्रयत्न केला असेल. तर काही ट्रेनमध्ये १५-१६ डब्बे असतात आणि काहींना २५ डब्बे असतात. परंतु जगात अशी एक ट्रेन आहे, तिचे जवळपास ६८२ डब्बे आहेत. समोरून जाणाऱ्या या ट्रेनच्या डब्ब्यांची संख्या मोजणे सोपे नाही.
2 / 6
६८२ डब्बे असलेली ही जगातील सर्वात लांब ट्रेन आहे. या ट्रेनच्या लांबीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की यात २४ आयफेल टॉवर्स बसू शकतात. ट्रेन इतकी लांब आहे, की चालवण्यासाठी एक-दोन इंजिन पुरेशे नाहीत. तर ही ट्रेन चालवण्यासाठी ८ इंजिनची गरज आहे. या ट्रेनचे वजन जवळपास एक लाख टन आहे.
3 / 6
जगातील सर्वात लांब ट्रेनचे नाव 'द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओर' आहे. दरम्यान, ही प्रवासी ट्रेन नसून एक मालगाडी आहे. ही ट्रेन २१ जून २००१ रोजी पहिल्यांदा रुळांवर धावली होती. इंजिनपासून शेवटच्या डब्यापर्यंत या ट्रेनची लांबी ७.३ किमी आहे. ८ लोकोमोटिव्ह इंजिन आणि ६८२ डब्बे असलेली ही ट्रेन कोळसा वाहतूक करण्यासाठी वापरली जाते.
4 / 6
लांब असण्यासोबतच ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओरला सर्वात वजनदार ट्रेन म्हणूनही ओळखली जाते. ऑस्ट्रेलियाच्या यांडी माइन ते पोर्ट हेडलँड बीचपर्यंत धावणारी ही ट्रेन २७५ किलोमीटरचे अंतर कापते, ज्यामध्ये तिला १० तास लागतात. या ट्रेनची क्षमता ८२,००० टन आयर्न ओरची आहे.
5 / 6
ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओर ट्रेन ही सरकारी नसून खाजगी ट्रेन आहे, जी बीएचपीच्या खाजगी रेल्वे मार्गावर धावते. कंपनीने लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग आणि ट्रेन तयार केली आहे. सध्या मागणी कमी असल्यामुळे या ट्रेनमधील डब्यांची संख्या २७० करण्यात आली आहे. इंजिन ८ ऐवजी ४ पर्यंत कमी केले आहेत.
6 / 6
या ट्रेनने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात लांब ट्रेनला मागे टाकत सर्वात लांब ट्रेनचा किताब पटकावला होता. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रेनमध्ये ६६० डब्बे होते. 'माउंट न्यूमन रेल्वे' म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन एकच ड्रायव्हर चालवतो.
टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके