बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 4:18 PM
1 / 5 प्रत्येकजण रोज साबणानेच आंघोळ करतो. हे वेगवेगळे साबण वेगवेगळ्या किंमतीचे असू शकतात. काही लोकांकडे १० ते १५ रूपयांचा साबण असेल तर काही लोकांकडे ५० ते १०० रूपयांचा साबण असेल. साधारणपणे साबणाची एवढीच किंमत सर्वसामान्यांना माहीत असते. पण कधी तुम्ही २ लाख रूपयांचं साबण पाहिला का? नाही ना! पण असं एक साबण आहे. 2 / 5 जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जगात एक असंही साबण आहे ज्याची किंमत शेकडो किंवा हजारो नाही तर लाखो आहे. यावर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी हे सत्य आहे. एक असंही साबण आहे ज्याची किंमत लाखांमध्ये आहे. त्याला कारणंही तसंच खास आहे 3 / 5 बीबीसीच्या रिपोर्टनुसार, लेबनानच्या त्रिपोलीमध्ये हे साबण तयार केलं जातं. हे साबण बशर हसन अॅन्ड सन्सकडून तयार केलं जातं. हे साबण तयार केल्यावर The Khan Al Saboun नावाने विकलं जातं. हा परिवार लक्झरी सोपसोबतच अनेक स्कीनकेअर प्रॉडक्टही विकतो. ज्यात शुद्ध वस्तूंचा वापर केला जातो. 4 / 5 हे साबण तयार करण्यासाठी १७ ग्रॅम शुद्ध सोन्याच्या पावडरचा वापर केला जातो. त्यासोबतच काही ग्रॅम हिऱ्याचं पावडर, थोडं शुद्ध जैतूनचं तेल, ऑर्गेनीक हनी आणि खजूराचा वापर केला जातो. सोनं आणि हिऱ्याच्या पावडरच्या वापरामुळे हे साबण जगातलं सर्वात महाग साबण बनतं. या साबणाची सध्याची किंमत २,८०० डॉलर म्हणजे २ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. 5 / 5 परिवाराचा दावा आहे की, या साबणामुळे व्यक्तीला आध्यात्मिक आणि मानसिक शांती मिळते. पण या दाव्याला काही पुरावा नाही. अनेक सेलिब्रिटी आणि अरबी व्यापारी हे साबण खरेदी करतात. खासकरून दुबईत राहणारे लोक हे साबण अधिक वापरतात. सध्या हे स्पष्ट नाही की, सामान्य लोकही ऑर्डर देऊन हे साबण मागवू शकतात की नाही. आणखी वाचा