world most luxury train venice simplon orient express
जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 8:03 PM1 / 6ट्रेनने सर्रास बरेच जण प्रवास करत असतात. मात्र, या ट्रेन प्रवासादरम्यान पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध असतील तर कोणाला प्रवास करायला आवडत नाही? असाच अनुभव जगातील सर्वात लक्झरी ट्रेन व्हेनिस-सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेसमध्ये (Venice-Simplon Orient Express) मिळतो. या ट्रेनची खासियत काय आहे आणि या ट्रेनमध्ये तुम्ही कोठून प्रवासाचा आनंद लुटू शकता, याबाबत जाणून घेऊया...2 / 61920-30 च्या दशकात ओरिएंट एक्स्प्रेस (Orient Express) खूप प्रसिद्ध होती, कारण त्यावेळी अशा गाड्यांचे युग आले नव्हते. त्यात प्रवास करणे हे त्याकाळी प्रत्येक माणसाचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न आजही कायम आहे. प्रवासादरम्यान, प्रवाशांना या लोकप्रिय लक्झरी केबिनमध्ये शॅम्पेन मिळते. बारमध्ये क्रिस्टल ग्लासेसमध्ये पेय दिले जाते. आलिशान लेदरच्या खुर्च्यांवर बसून प्रवासी उत्तम जेवणाचा आनंद घेऊ शकतात.3 / 6यामध्ये लोकांना झोपण्यासाठी खाजगी स्लीपिंग क्वार्टर आहेत, जेथे बेडवर रेशमी चादर घातली जाते. प्रवासादरम्यान, मखमली पलंगावर इतकी शानदार झोप येते की प्रवासी एका शहरात झोपलेले असतात, तर ते दुसऱ्या शहरात जागे होतात.4 / 6ओरिएंट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना पंचतारांकित हॉटेलचा अनुभव येतो. यात बार, थीम रेस्टॉरंट आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा आहेत. ट्रेनने लोकांनी लंडन ते इटलीतील व्हेनिसपर्यंतच्या प्रवास केला आहे. या ट्रेनचा उद्देश ब्रिटनला युरोपियन रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा होता. ही जगातील सर्वात महागड्या ट्रेनपैकी एक आहे.5 / 6हिस्ट्री इन पिक्चर्सनुसार, ही लांब पल्ल्याच्या ट्रेन 1883 मध्ये बांधली गेली होती आणि 1920 ते 1930 च्या दशकात ती खूप लोकप्रिय होती. या ट्रेनचे आतील भाग उत्तम शैलीचे आहे. ओरिएंट एक्स्प्रेस सुरू करण्याचा उद्देश ब्रिटनला युरोपियन रेल्वे नेटवर्कशी जोडणे हा होता.6 / 6मूळ ओरिएंट एक्सप्रेस 1977 मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र, आता ही ट्रेन पुन्हा परतण्यासाठी सज्ज झाली आहे. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या वेळी नॉस्टॅल्जी-इस्तंबूल-ओरिएंट-एक्सप्रेस म्हणून ते पुन्हा सुरू केली जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications