शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वात महागडे 'फ्रेंच फ्राईज' पाहिलेत का? गिनीज बुकात झाली नोंद, असं काय आहे यात? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 6:07 PM

1 / 8
'फ्रेंच फ्राईज' हे सध्याच्या युगातील सर्वात आवडत्या आणि लोकप्रिय फास्ट फूड पैकी एक आहे. पण अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमधील 'फ्रेंच फ्राईज' रातोरात सुप्रसिद्ध झाले आहेत.
2 / 8
न्यूयॉर्कमधील Serendipty3 या रेस्टॉरंटमधील दोन शेफनं एक अनोखा विक्रम नावावर केला आहे. दोघांनी मिळून जगातील सर्वात महागडे 'फ्रेंच फ्राईज' तयार केले आहेत.
3 / 8
दोघांनी या महागड्या फ्रेंच फ्राईजचं नाव Creme de la Creme Pomme Frites असं दिलं आहे.
4 / 8
शेफ जो आणि शेफ फ्रेड्रिक यांनी ही डिश तयार केली आहे. जगभरात सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज तयार करण्यासाठी दोघांनी चिपरबेक बटाटा, लेब्लांक फ्रेंच शॅम्पेन, डोम परिगनन शॅम्पेन, व्हिनेगर, ग्वेरांड टफल मीठ, टफल ऑइल, इटलीत तयार झालेलं चीझ, टफल बटर, ऑर्गेनिक ए२ फेड क्रीम आणि खाण्यायोग्य सोन्याचा मुलामा याचा वापर केला आहे.
5 / 8
अशा अफलातून पदार्थांनी तयार करण्यात आलेले फ्रेंच फ्राइज विक्रीसाठी जेव्हा दोन्ही शेफनं रेस्टॉरंटमध्ये ठेवले तेव्हा एका ग्राहकानं तातडीनं ते २०० अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास १४ हजार ९९२ रुपयांना खरेदी केले.
6 / 8
ग्राहकाच्या या खरेदीनंतर हे फ्रेंच फ्राईज जगातील सर्वात महाग फ्रेंच फ्राईज ठरले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद करण्यात आली आहे.
7 / 8
Serendipty3 हे न्यूयॉर्कमधील एक नावजलेलं रेस्टॉरंट आहे.
8 / 8
गिनीज बुककडून दखल घेण्यात आल्यानंतर शेफ फ्रेड्रीक आणि शेफ जो दोघांही खूप आनंदी पाहायला मिळाले.
टॅग्स :foodअन्नguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड