World's most expensive potato, price will shock you
जगातले सगळ्यात महाग बटाटे, १ किलोची किंमत वाचून बसेल धक्का! By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 3:34 PM1 / 7World Most Expensive Potato : जगभरातील लोक बटाट्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने आवडीने सेवन करतात. बाजारात बटाटे सामान्यपणे ७० ते ८० रूपये किलो भावाने मिळतात. मात्र, बटाट्याची एक प्रजात अशी आहे ज्यामुळे शेतकरी कोट्याधीश बनतात. हे बटाटे फार दुर्मीळ असून फार कमी दिवसांसाठी मिळतात. हे बटाटे आपल्या पौष्टिक तत्वांसाठी ओळखले जातात. 2 / 7बटाट्याची भाजी जवळपास सगळ्यात घरांमध्ये रोज किंवा एक दिवसआड बनवली जाते. पण तुम्हालाही माहीत नसेल की, बटाट्याची एक अशी प्रजात आहे ज्याची किंमत सोन्याएवढी आहे. 'ले बोनाटे' नावाच्या बटाट्यांचं उत्पादन जगातील काही भागांमध्ये घेतलं जातं. या बटाट्यांची शेती फार अवघड असते. त्यामुळे याची किंमतही जास्त असते.3 / 7फ्रान्सच्या नॉर्मेंडि भागात उत्पादन घेतला जाणारा ले बोनाटे बटाटा फार खास आहे. या बटाट्यांचं उत्पादन पारंपारिक पद्धतीने केलं जातं. हे बटाटे आपल्या मुलायमपणासाठी तर ओळखले जातातच, सोबतच आपल्या पोषक तत्वांसाठीही ओळखले जातात. इतर बटाट्यांपेक्षा यात जास्त पोषक तत्व आणि मिनरल्स असतात. तसेच याची टेस्टही इतर बटाट्यांपेक्षा वेगळी असते. 4 / 7या बटाट्यामध्ये फायबर, प्रोटीन, वेगवेगळे व्हिटॅमिन्स, खनिज जसे की, आयर्न, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. 5 / 7ले बोनाटे बटाट्यांचं सेवन करून अनेक गंभीर आजार जसे की, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रोखण्यास मदत मिळते. या बटाट्याच्या एका किलोची किंमत इतकी असते की, तुम्ही तेवढ्यात सोन्याचा एखादा दागिना घेऊन शकता. 6 / 7हे बटाटे वर्षातील केवळ १० दिवसच मिळतात. त्याशिवाय याची सालही अनेक दृष्टीने फायदेशीर असते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच्या एक किलोची किंमत साधारण ५० हजार रूपये असते. हे बटाटे फार दुर्मीळ आहेत त्यामुळे यांची शेतीही कमी केली जाते.7 / 7या बटाट्यांचं उत्पादन केवळ ५० वर्ग मीटरच्या छोट्या शेतांमध्ये घेतलं जातं आणि यांच्यासाठी केवळ नैसर्गिक खतच वापरलं जातं. तसेच यासाठी समुद्री शेवाळाचाही वापर केला जातो. हे बटाटे फार नाजूक असल्याने त्यांची काढणी हातानेच केली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications