Worlds most poisonous frog cost 150000 rupees for one at science
बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण.... By अमित इंगोले | Published: January 21, 2021 2:09 PM1 / 12जगभरात कोणकोणत्या गोष्टींची तस्करी होते याचा अंदाजही आपल्याला नसतो. सोनं, चंदन, ड्रग्स, प्राण्यांची कातही अशा गोष्टींची तस्करी होत असल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. पण कधी बेडकाचीही तस्करी होते असं तुम्ही ऐकलं का? नक्कीच ऐकलं नसेल. 2 / 12जगातल्या सर्वात विषारी बेडकाची तस्करी जगभरात होते. या बेडकामध्ये इतकं विष असतं की, १० लोकांचा जीव घेता येतो. या खास प्रजातीच्या बेडकाला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये २ हजार डॉलर म्हणजे १ लाख ५० हजार रूपये इतकी किंमत मिळते. चला जाणून घेऊ कोणता आहे हा बेडूक आणि का होते याची तस्करी?3 / 12बेडकाच्या या प्रजातीचं नाव आहे पॉयजन डार्ट बेडूक. ही एक फार दुर्मीळ प्रजाती आहे. सामान्यपणे हे बेडूक पिवळ्या आणि काळ्या रंगाचे असतात. काही हिरवे-चमकदार नारंगी रंगाचे आणि काही निळे-काळ्या रंगाचे असतात. या बेडकातील विषामुळे याची तस्करी केली जाते.4 / 12सामान्यपणे या बेडकाची लांबी १.५ सेंटीमीटर इतकी असते. तर काहींची ६ सेंटीमीटर असते. तर त्यांचं वजन २८ ते ३० ग्रॅम असतं. पण त्यांच्यातील थोड्या विषानेही १० लोकांचा जीव जाऊ शकतो. 5 / 12पॉयजन डार्ट बेडून मुख्यत्वे बोलिविया, कोस्टारिया, ब्राझील कोलंबिया, इक्वाडोर, व्हेनिझुएला, सूरीनाम, फ्रेंच गुएना, पेरू, पनामा, गुयाना, निकारागुआ आणि हवाईच्या जंगलात आढळतात. नर बेडूकच आपल्या अंड्यांची रक्षा करतात. 6 / 12पॉयजन डार्ट बेडकाचे ४२४ छोटे बेडूक नुकतेच बगोटा येथील अल-डोराडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका प्रवाशाच्या बॅगेत सापडले होते. यातील प्रत्येकी एका बेडकाची किंमत २००० डॉलर म्हणजे १.५० लाख रूपये इतकी आहे. हे सगळे बेडूक विषारी होते.7 / 12जर्मनी येथील हम्बोल्ट इन्सिट्यूटमधील वैज्ञानिकांचं मत आहे की, कोलंबियामध्ये २०० एंफीबियंस म्हणजे उभयचर प्राण्यांना लुप्त होणारे प्राणी म्हणून घोषित केलंय. ज्यात या बेडकांचाही समावेश आहे. या बेडकांचा रंग आणि त्यांचं विष त्यांना बहुमूल्य बनवतं.8 / 12या बेडकांना वाचवण्याचा प्रयत्न १६ वर्षांपासून केला जात आहे. पण यांची तस्करी कमीच होत नाहीय. पॉयजन डार्ट बेडूक आणि यासंबंधी प्रजातींना वाचवण्यासाठी कोलंबियामध्ये कमर्शिअल ब्रिडींग प्रोग्राम सुरू केलाय. जेणेकरून त्यांना वाचवता येईल.9 / 12मोठ्या संघर्षानंतर या ब्रीडिंगमधून २०११ मद्ये पिवळ्या पॉयजन डार्ट बेडकांची लीगल एक्सपोर्ट करण्याला परवानगी मिळाली आहे. २०१५ मध्ये याच प्रजातीशी मिळत्या जुळत्या तीन प्रजातींना अशीच परवानगी मिळाली होती. हे बेडूक अमेरिका, यूरोप आणि आशियात पाठवले जातात.10 / 12नुकताच एक रिसर्च करण्यात आला होता ज्यात सांगण्यात आले होते की, २०१४ ते १७ दरम्यान अमेरिकेत मागवण्यात आलेल्या बेडकांपैकी सर्वात जास्त भाग हा पॉयजन डार्ट बेकडांचा होता. या बेडकांच्या विषाचा वापर औषधांमध्ये केला जातो. या विषाने पेनकिलर औषधे तयार केली जातात.11 / 12पॉयजन डार्ट बेडकांमधून निघालेल्या विषापासून तयार केलेल्या औषधांचा प्रभाव मॉर्फिनपेक्षा २०० पटीने अधिक होतो. त्यामुळे या औषधांची अजून क्लीनिकल ट्रायलच सुरू आहे. कारण या विषाने १० ते २० माणसे किंवा १० हजार उंदरं मारली जाऊ शकतात. या विषाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून औषधात याचा वापर सुरक्षितपणे करता यावा.12 / 12पॉयजन डार्ट बेडकांमधून निघालेल्या विषापासून तयार केलेल्या औषधांचा प्रभाव मॉर्फिनपेक्षा २०० पटीने अधिक होतो. त्यामुळे या औषधांची अजून क्लीनिकल ट्रायलच सुरू आहे. कारण या विषाने १० ते २० माणसे किंवा १० हजार उंदरं मारली जाऊ शकतात. या विषाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून औषधात याचा वापर सुरक्षितपणे करता यावा. आणखी वाचा Subscribe to Notifications