शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्न खर्चाला पैसे नाहीत? भाऊ, आता चिंता कसली! कंपनीनं आणली भन्नाट MNPL योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 9:48 AM

1 / 9
लग्न म्हटलं तर दोन जीवांचे मिलन, हे एक असं पवित्र बंधन आहे. लग्न करणं हा प्रत्येकाचा आयुष्याचा भाग आहे. पण याच लग्नासाठी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. गरिब असो वा श्रीमंत आपल्या ऐपतीनुसार लग्नात खर्च केले जातात.
2 / 9
जर तुम्हालाही लग्न करायचंय आणि तुमच्याकडे पैसे नाहीत तर चिंता करण्याचं कारण नाही. आता सहजपणे तुम्ही लग्न करू शकता. कारण लग्न खर्चासाठी पैसा आणण्याची झंझट संपली. कारण लग्नाळु जोडप्यांसाठी एका कंपनीने अशी भन्नाट योजना आणली आहे.
3 / 9
खरंतर तुम्ही लग्नासाठी कर्ज घेऊ शकता. तुम्ही हे कर्जनंतर EMI वर सहज फेडू शकता. आतापर्यंत लोक ऑनलाइन शॉपिंग, घर इत्यादी अनेक गोष्टी कर्जावर खरेदी करतात. त्याचे EMI देतात. या खरेदीसाठी Buy Now Pay Later ही सुविधा उपलब्ध आहे.
4 / 9
मात्र आता लोक कर्ज घेऊनही लग्न करू शकतात. आता लग्नासाठीही Marry Now Pay Later ही सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेसाठी फिनटेक कंपनी Sankash ने रॅडिसन हॉटेलशी करार केला आहे. येत्या काळात ही सुविधा देशभरात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
5 / 9
या सुविधेतील लग्नाची जागा रेडिसन हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. MNPL योजना देशभरात सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत त्यांच्याकडे फ्लाय नाऊ, पे लेटर होते. यानंतर Sell Now Pay Later आले.
6 / 9
कंपनीनं रेडिसनच्या मदतीनं स्टे नाऊ पे लेटर सुविधा सुरू केली. त्यानंतर कंपनीला या योजनेचा विचार आला. रेडिसनच्या उत्पन्नापैकी २० टक्के उत्पन्न फूड अँड बेवरेज यातून येते. यामध्ये मॅरेज मार्केटची भूमिका सर्वाधिक असते.
7 / 9
कंपनीने हा प्लान सध्या दिल्ली-NCR मध्ये लॉन्च केला होता. आता ते राजस्थान आणि मध्य प्रदेशातही उपलब्ध आहे. लवकरच ही योजना देशभरात सुरू करण्याचं प्लॅनिंग कंपनीकडून आखले जात आहे. या वर्षाअखेरीस ही सुविधा सर्व रॅडिसन हॉटेल्समध्ये उपलब्ध होणार आहे.
8 / 9
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंतचा फंड घेऊ शकते. हे पैसे ६ ते १२ महिन्यांचा परतफेड कालावधी दिले जातात. चार ते सहा तासांत पैसे समोरच्याच्या खात्यात येतात.
9 / 9
कंपनी ग्राहकाच्या नावावर रेडिसनला पैसे देते. विशेष म्हणजे सहा महिन्यांपर्यंत या पैशांवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. जर ग्राहकाने १२ महिन्यांचा कर्ज परतफेड कालावधी निवडला तर त्याला दरमहा १ टक्के व्याज द्यावे लागेल.
टॅग्स :marriageलग्न