Xueli Abbing once an abandoned baby now became a top model
क्या बात! एका आजाराच्या भीतीने आई-वडिलांनी जन्मताच टाकून दिलं होतं, आता बनली जगातली टॉप मॉडल By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 3:06 PM1 / 14अनेकदा आपल्याला अशा काही सत्य घटना ऐकायला मिळतात, ज्या जाणून घेतल्या मनाला चटकाही बसतो आणि दुसरीकडे प्रेरणाही मिळते. अशाच एका मुलीची प्रेरणादायी आणि वेदनादायी कहाणी आज आम्ही सांगणार आहोत. या मुलीला जन्मताच आई-वडिलांनी सोडून दिलं होतं, आज ती जगातल्या टॉप मॉडलपैकी एक आहे. (All Image Credit : xueli-abbing)2 / 14ही सत्य कहाणी आहे चीनमध्ये जन्माला आलेल्या ज्वेली एबिनची. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, ज्वेली एबिन बालपणापासून एल्बिनिज्म नावाच्या आजाराने ग्रस्त होती. ज्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला जन्मताच अनाथाश्रमातून सोडून दिलं होतं.3 / 14आता ज्वेली एबिन एक वर्ल्ड फेमस मॉडल बनली आहे. नुकतीच ती प्रसिद्ध 'वोग' या मॅगझिनच्या कव्हरवर दिसली होती. इतकंच नाही तर जगातल्या अनेक डिझायनर्सनी ज्वेलीला त्यांची ब्रॅंड अॅम्बेसेडर बनवलं आहे.4 / 14ज्या ज्वेली एबिनला एका आजारामुळे तिच्या आई-वडिलांनी सोडून दिलं होतं आज ती भरपूर पैसा कमवत आहे. आणि सोबतच तिचं नावंही मोठं आहे. ज्वेली एबिन आता १६ वर्षांची आहे. तिला तिची मूळ जन्मतारीख माहीत नाही.5 / 14रिपोर्ट्सनुसार, ज्वेली एबिनच्या आई-वडिलांनी तिला एका अनाथालयात सोडलं होतं. ती तिथे काही दिवस राहिली. तीन वर्षांची असताना तिला नेदरलॅंडच्या एका कपलने दत्तक घेतलं. ती त्यांच्यासोबत गेली. त्यानंतर ज्वेलीचं आयुष्य बदललं.6 / 14ज्वेली सांगते की, ती सर्वातआधी हॉंगकॉंगच्या एका डिझायनरच्या संपर्कात आली होती. त्यानंतर हळूहळू तिने मॉडलिंगमध्ये नाव कमावलं. ज्वेली हे नाव तिला अनाथाश्रमातच मिळालं होतं. त्याचा चीनी भाषेत 'बर्फासारखी सुंदर' असा अर्थ होतो.7 / 14ज्वेलीला एल्बिनिज्म हा आजार होता. या आजाराला चीनमध्ये अभिषाप मानला जातो. याबाबत ज्वेली सांगते की, माझ्या जन्मावेळी चीनमध्ये एकच अपत्य असावं असा नियम होता. माझ्यासारखा मुलांना एकतर अनाथाश्रमात सोडलं जायचं किंवा मारलं जायचं. आता वेगळं दिसणं माझ्यासाठी अभिषाप नाही तर वरदान ठरलं आहे. मी आता लोकांना या आजाराबाबत जागरूक करते.8 / 14ज्वेलीने असंही सांगितलं की, ती तिच्या परिवारासोबत एल्बिनिज्म आजाराविरोधात एक अभियान चालवते. या अभियानाचं नाव आहे परफेक्ट इम्परफेक्शन. 9 / 14एल्बिनिज्म हा एक त्वचा रोग असतो ज्यात व्यक्तीची त्वचा आणि केसांचा रंग पाढरा किंवा पिवळा होतो. उन्हात यांची त्वचा फार संवेदनशील असते. या रोगामुळे डोळेही प्रभावित होतात.10 / 14एल्बिनिज्म हा एक त्वचा रोग असतो ज्यात व्यक्तीची त्वचा आणि केसांचा रंग पाढरा किंवा पिवळा होतो. उन्हात यांची त्वचा फार संवेदनशील असते. या रोगामुळे डोळेही प्रभावित होतात.11 / 14एल्बिनिज्म हा एक त्वचा रोग असतो ज्यात व्यक्तीची त्वचा आणि केसांचा रंग पाढरा किंवा पिवळा होतो. उन्हात यांची त्वचा फार संवेदनशील असते. या रोगामुळे डोळेही प्रभावित होतात.12 / 14एल्बिनिज्म हा एक त्वचा रोग असतो ज्यात व्यक्तीची त्वचा आणि केसांचा रंग पाढरा किंवा पिवळा होतो. उन्हात यांची त्वचा फार संवेदनशील असते. या रोगामुळे डोळेही प्रभावित होतात.13 / 14एल्बिनिज्म हा एक त्वचा रोग असतो ज्यात व्यक्तीची त्वचा आणि केसांचा रंग पाढरा किंवा पिवळा होतो. उन्हात यांची त्वचा फार संवेदनशील असते. या रोगामुळे डोळेही प्रभावित होतात.14 / 14एल्बिनिज्म हा एक त्वचा रोग असतो ज्यात व्यक्तीची त्वचा आणि केसांचा रंग पाढरा किंवा पिवळा होतो. उन्हात यांची त्वचा फार संवेदनशील असते. या रोगामुळे डोळेही प्रभावित होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications