You know some useful hair dryer hacks
केसांशिवाय हेयर ड्रायरचा असाही वापर; 'हे' आहेत हॅक्स! By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 2:15 PM1 / 6जर तुम्ही हेयर ड्रायरचा वापर फक्त केसांसाठी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. हेयर ड्रायर फक्त केसांसाठीच नाही तर घरातील अनेक कामांसाठी तुमची मदत करू शकतो. त्यामुळे तुमची कामं सोपी होण्यासही मदत होते. जाणून घेऊया हेयर ड्रायरचा केसांव्यतिरिक्त ज्या कामांसाठी वापर करू शकतो त्याबाबत...2 / 6घरात लहान मुलं असली की,सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात. मुलांना स्टिकर्स खूप आवडतात. परंतु यामुळे घराची शोभा बिघडते. काही स्टिकर्सचे ग्लू निघता निघत नाही त्यामुळे ते अर्धवटच निघतात. हे स्टिकर्स हटवण्यासाठी हेयर ड्रायर तुमची मदत करतो. तुम्ही या स्टिकर्सवर ड्रायरने गरम हवेचा मारा करा. त्यानंतर कपड्याच्या मदतीने स्टिकर्स काढून टाका. 3 / 6एखाद्या गोष्टीवर लागलेलं वॅक्स म्हणजेच मेण काढून टाकणं अत्यंत अवघड असतं. खासकरून जर ते काचेवर लागलेलं असेल तर ते काढून टाकणं म्हणजे डोक्याला ताप. अनेकदा काचेवरून ते काढून टाकताना त्यावर स्क्रॅचेस येतात. आपल्या हेयर ड्रायरने वॅक्स वितळवा आणि कपड्याने पुसून टाका. काचेवर स्क्रॅच न पडता मेण निघून जाईल. 4 / 6लॅपटॉपवर काम करताना जर की-बोर्डवर काही पडलं तर ते स्वच्छ करण्यासाठी हेयर ड्रायर तुमची मदत करेल. जर पाणी पडलं तरिदेखील हेयर ड्रायरने तुम्ही ते सुकवू शकता.5 / 6जर तुमच्या घरातील आयर्न किंवा इस्त्री खराब झाली असेल आणि त्यामुळे तुम्ही कपड्यांना इस्त्री करू शकत नसाल तर, अशावेळी हेयर ड्रायर तुमच्यासाठी उपयोगी ठरतो. ज्या कपड्यांला इस्त्री करायची आहे ते हॅगरला लावा. त्यावर थोडसं पाणी स्प्रेच्या सहाय्याने मारा. त्यानंतर ड्रायर मॅक्सिमम हीटवर लावा आणि त्याच्या मदतीने कपड्यांवरील पाणी सुकवून घ्या. ड्रेस स्टीम आयर्न होण्यास मदत होते. 6 / 6 टी-शर्टवर लावलेलं कोणतंही लेबल किंवा प्रिंटेड लेबल हटवण्यासाठी तुम्ही हेयर ड्रायरची मदत घेऊ शकता. टी-शर्टवर ब्लो ड्रायरन हीट गरम वाफ मारा. त्यामुळे लोगो काढून टाका. आणखी वाचा Subscribe to Notifications