शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झोंबीच्या हातांसारखे दिसणारे हे फंगस पाहुन तुमचाही उडेल थरकाप, पाहा कुठे आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 9:49 PM

1 / 10
ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल पार्कमध्ये एक फंगस उगवलीय जी झोंबिच्या हातासारखी दिसतेय. हे फोटो सोशल मिडियावर जोरात व्हायरल होत आहेत.
2 / 10
असं म्हणतात की ही फंगस पुर्वी होती पण नष्ट झालेली. आता ही फंगस पुन्हा एकदा दिसू लागली आहे.
3 / 10
याचा शोध लावणाऱ्यांनी म्हटलंय की ही फंगस अत्यंत दुर्मिळ असून हातांच्या बोटासारखी दिसते.
4 / 10
याचा शोध व्हिक्टोरियाच्या फ्रान्सिस द्वीप येथे १६ पर्यावरणकर्त्यांनी लावला होता.
5 / 10
हाइपोक्रोप्सिस अ‍ॅम्प्लेक्टेंस फंगस ज्यांना टी ट्री फिंगर्स किंवा झोंबी फिंगर्स या नावांनाही ओळखले जाते.
6 / 10
हे फंगस ऑस्ट्रेलियाच्या कमी दाट जंगलांमध्ये पाहायला मिळते. येथील वनस्पती आग आणि मानवी अतिक्रमणाने नष्ट झाल्या आहेत.
7 / 10
संशोधनानुसार हे फंगस फ्रान्सिस द्वीपवर शोध लागण्याआधी वेस्टर्न पोर्ट बे च्या तटावर आणि लॉंचिंग स्पेसवर आढळण्यात आले होते.
8 / 10
डॉ. माईकल अमोरा यांच्या मते हे फंगस केवळ संरक्षित राष्ट्रीय उद्यान, रॉल बॉटेनिकल गार्डन व्हिक्टोरिया येथे सुरक्षित आहेत.
9 / 10
डॉ. अमोरा यांच्या मते हे फंगस ज्या चार ठिकाणी उपलब्ध आहेत त्यापैकी तीन ठिकाणांवरील त्याचे अस्तित्व धोक्यात आहे. कारण, या जागा आता रेतीच्या खाणींनी भरलेल्या आहेत.
10 / 10
आययुसीएन यांनी बनवलेल्या फंगसच्या यादीनुसार या फंगसची संख्या जगभरात फक्त ५० ते ४०० इतकी आहे. ती जास्तीत जास्त २०० ने अधिक असेल. त्यांनी असंही म्हटलंय या फंगसचे अस्तित्व जगात ७ ठिकाणी होते. ज्यापैकी अनेक ठिकाणी ते नष्ट झाले आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके