You will also be amazed at the secret of the world's largest China wall
जगातील सर्वात मोठ्या चीनच्या भिंतीचं रहस्य ऐकून तुम्हीही चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 9:08 AM1 / 6चीनच्या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी एक तटबंदी भिंत असून दगड, विटा, चिखल, लाकूड यांचा वापर करून ही भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत चीनच्या पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरली आहे. 2 / 6चीनच्या भिंतीची उंची सुमारे 30 फूट आहे तर काही ठिकाणी ही भिंत मोठ्या शिखराप्रमाणे दिसते. 3 / 6मंगोल लोकांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी या भिंतीची उभारणी करण्यात आली होती. चीनच्या या भिंतीचे बांधकाम 5 व्या शतकात सुरू झाले अन् 16 व्या शतकात बांधकाम पूर्ण झाले. 4 / 6१९३० साली चीन सरकारने या भिंती वरून महामार्ग बनवण्याची योजना आखलेली होती. ज्यामुळे देशाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत सरकारी मदत पोचवणे सोपे जाईल. अन्न आणि लष्करी मदत पोचवण्यासाठी याचा वापर केला जाईल असा यामागे हेतू होता. परंतु, या भिंतीवरील हा महामार्ग अस्तित्वात आलाच नाही.5 / 6ही भिंत बांधताना चिकट तांदळाचा वापर करण्यात आला आहे. या भिंतीचे बांधकाम मजबूत व्हावे म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे.6 / 6ही भिंत बांधताना चिकट तांदळाचा वापर करण्यात आला आहे. या भिंतीचे बांधकाम मजबूत व्हावे म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications