Zisiqiao village in eastern China's Zhejiang province has been snake farming
बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव! By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:09 PM1 / 10सध्या कोरोना व्हायरस पसरण्यामागे चीन जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. याठिकाणी लोक मोठ्या संख्येने मांसाहार करतात, त्यातूनच हा आजार पसरल्याचं सांगण्यात येतं.2 / 10तुम्ही भाजीपाला, फळांची शेती केली जाते हे ऐकलं असेल पण तुम्ही कधी अशा शेतीबद्दल ऐकलं आहे का? सापांची शेती केली जाते, ऐकून धक्का बसेल ना! पण हे खरं आहे. 3 / 10चीनच्या एका गावात विषारी सापांची शेती केली जाते, या गावाचं नाव जिसिकियाओ असं आहे. याठिकाणी तब्बल ३० लाखपेक्षा जास्त सापांचे प्रकार आढळतात. 4 / 10१ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सापांची शेती करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी प्रत्येक दुसरा व्यक्ती सापाच्या संगोपनाचं काम करतो.5 / 10या गावातील लोकांची मैत्री किंग कोब्रा आणि वायपरसारख्या सापांची आहे. सापांच्या शेतीसाठी जगभरात चीनमधील हे गाव प्रसिद्ध आहे. स्नेक फार्मिंग म्हणून याठिकाणी साप पाळले जातात. 6 / 10जिसिकियाओमध्ये वेगवेगळ्या सापांच्या प्रजाती आणि त्यांचे संगोपन केले जाते, यात किंग कोब्रा, अजगर, विषारी वायपरसारखे अनेक साप असतात. 7 / 10याठिकाणचे लोक सापांच्या अंगाला बाजारात विकून नफा कमवतात, चीनमध्ये सापांच्या मांसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या गावात सापांची शेती केली जाते. सापाचे विष विकूनही येथील लोक चांगली कमाई करतात. 8 / 10हे विषारी साप गावकऱ्यांसाठी सामान्य आहेत, सापांचे मांस विकून ते आपला उदरनिर्वाह करतात, त्यासोबत साप हे त्यांच्यासाठी अन्न आहे.9 / 10या गावातील लोक फक्त फाइव स्टेप सापाला भीतात, कारण हा साप चावला तर पाच पावलांवर जाताच चावा घेतलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.10 / 10चीनमध्ये सापांच्या मांसाला जास्त किंमत मिळते, त्यासाठी हे लोक सापांची शेती करुन पोट भरतात, ते सहजपणे विषारी सापांसोबत काम करताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications