शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ज्ञानाचं मंदिर! देवेंद्र फडणवीस पुस्तकांच्या घराला भेट देतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 1:43 PM

1 / 8
विधानसभा विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे कुशाग्र बुद्धीमत्तेचे आहेत. कायद्याचे पदवीधर असलेले फडणवीस एक पुस्तकप्रेमीही आहेत.
2 / 8
विविध पुस्तकांचे वाचन आणि घडामोडींचं बारकाईनं निरीक्षण ते करत असतात. त्यातूनच मीडियाशी संवाद साधताना ते अनेक संदर्भ देऊन भाष्य करतात.
3 / 8
फडणवीस यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांचं वाचनही भरपूर आहे. म्हणूनच ते विरोधकांच्या प्रश्नाला, टीकेला जशास तसं उत्तर देतात.
4 / 8
फडणवीस यांनी नुकतेच डोंबिवली येथील पाईस् फ्रेंड्स लायब्ररीला भेट दिली. या लायब्ररी भेटीचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरुन शेअर केले आहेत.
5 / 8
पुस्तकांच्या अवतीभोवती राहून खूप भारी वाटलं. पण मला येथे अधिक वेळ व्यतीत करायची इच्छा होती, असे फडणवीस यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. तसेच, या लायब्ररीला त्यांनी ज्ञानाचं मंदिर... असं संबोधलंय.
6 / 8
केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासमेवत फडणवीस यांनी या लायब्ररीला भेट दिली. त्यावेळी, ग्रंथालयाकडून त्यांना पुस्तक भेट देण्यात आले.
7 / 8
फडणवीस यांनी या लायब्ररीच्या भेटीत अनेक पुस्तके चाळली. तर, बालपणीच्या आठवणी जागवणारं चंपक हे पुस्तकही त्यांनी हातात घेतल्याचं एका फोटोत दिसत आहेत.
8 / 8
फडणवीस यांनी पुस्तकाच्या घराला भेट दिल्यानंतर हे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियातून भाजप कार्यकर्त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdombivaliडोंबिवलीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील