शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गणपतीपुळ्याहून नवस फेडून परतताना नियतीचा घाला, पुण्यातील एकाच कुटुबांतील १३ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 6:38 PM

1 / 27
अपघात झाल्यानंतर कोल्हापुरातील बुधवार पेठेतील तरुणांनी मदतकार्य सुरू केले.(आदित्य वेल्हाळ)
2 / 27
अपघातस्थळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी भेट दिली व मदतकार्याच्या सूचना दिल्या.(आदित्य वेल्हाळ)
3 / 27
कोल्हापूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या जवानांनी बोटीतून जाऊन गाडीतील जखमींना वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.(आदित्य वेल्हाळ)
4 / 27
अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या साहाय्याने पुलावर आणल्यावर त्यातील मृतदेह सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)
5 / 27
अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या साहाय्याने पुलावर आणल्यावर त्यातील मृतदेह सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)
6 / 27
अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या साहाय्याने पुलावर आणल्यावर त्यातील मृतदेह सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)
7 / 27
अपघातग्रस्त गाडीतून मृतदेह असे बाहेर काढताना पाहून काळजाचा थरकाप उडत होता.(आदित्य वेल्हाळ)
8 / 27
घटनास्थळी आमदार सतेज पाटील, शारंगधर देशमुख, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, ऋतुराज पाटील, आदी अपघात झाल्यापासून ते मृतदेह बाहेर काढून नातेवाईक येईपर्यंत थांबून होते व आवश्यक ती मदत करीत होते. (आदित्य वेल्हाळ)
9 / 27
अपघातानंतर पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक अशी बंद केली. (आदित्य वेल्हाळ)
10 / 27
अपघातग्रस्त गाडी क्रेनने शिवाजी पुलावर आणली तेव्हाचे छायाचित्र. (आदित्य वेल्हाळ)
11 / 27
नागरिकांनी दोरी लावून गाडी घाटाकडील बाजूस ओढून धरली; कारण ती पुलावर उचलताना पुलाच्या कमानीमध्ये अडकत होती. (आदित्य वेल्हाळ)
12 / 27
नागरिकांनी दोरी लावून गाडी घाटाकडील बाजूस ओढून धरली; कारण ती पुलावर उचलताना पुलाच्या कमानीमध्ये अडकत होती. (आदित्य वेल्हाळ)
13 / 27
रुग्णवाहिकेतून मृतदेहांना सीपीआर रुग्णालयात हलविताना.(आदित्य वेल्हाळ)
14 / 27
अपघातग्रस्त गाडी क्रेनने शिवाजी पुलावर आणली तेव्हाचे छायाचित्र. (आदित्य वेल्हाळ)
15 / 27
अशी निघाली गाडी बाहेर...! (आदित्य वेल्हाळ)
16 / 27
अशी निघाली गाडी बाहेर...! (आदित्य वेल्हाळ)
17 / 27
अशी निघाली गाडी बाहेर...! (आदित्य वेल्हाळ)
18 / 27
अशी निघाली गाडी बाहेर...! (आदित्य वेल्हाळ)
19 / 27
कोल्हापुरातील अपघातात मंदा केदारी या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्यांचे पती भरत केदारी यांनी रुग्णालयात जाऊन पत्नीची विचारपूस केली. तेव्हा त्यांच्या तोंडाला कोरड पडली होती. त्या ‘मला पाण्याचे दोन घोट द्या,’ अशी विनंती वारंवार करीत होत्या. ‘मलाच देवाने कशाला मागे ठेवले?’ असे त्या पतीला रडत-रडत सांगत होत्या. (दीपक जाधव)
20 / 27
‘माझी मम्मी कशी आहे हो बाबा...?’ अपघातात गंभीर जखमी झालेली प्राजक्ता दिनेश नागरे ही आजोबांना पाहिल्यावर त्यांच्याकडे ‘माझी मम्मी कशी आहे हो?’ अशी विचारणा करीत होती; परंतु नियतीने तिच्या मम्मीला हिरावून नेल्याचे तिलाही माहीत नव्हते. (दीपक जाधव)
21 / 27
अपघातग्रस्त मूळ केदारी कुटुंबातील कर्ते पुरुष भरत केदारी हे सीपीआर रुग्णालयात आल्यावर त्यांना अपघाताची तीव्रता समजली. तोपर्यंत त्यांना ही माहिती देण्यात आली नव्हती. घटनेची माहिती समजताच त्यांना अश्रू अनावर झाले. (दीपक जाधव)
22 / 27
शिवाजी पुलाचे काम रखडल्यानेच हा अपघात झाल्याच्या संतप्त भावना जुना बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व्यक्त केल्या व हा पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद करणार असल्याचे मध्यरात्रीच जाहीर केले. (दीपक जाधव)
23 / 27
अपघातग्रस्त वाहन चक्काचूर झाले होते. त्यातून मृतदेह बाहेर काढणे हेसुद्धा जिकिरीचे होते.(दीपक जाधव)
24 / 27
घटनास्थळी महापौर स्वाती यवलुजे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे थांबून होते. (दीपक जाधव)
25 / 27
अपघातस्थळी मध्यरात्रीही बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांत अनेकजण मोबाईलवर त्याचे फोटो काढत होते; त्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांची तारांबळ उडाली. (दीपक जाधव)
26 / 27
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. (दीपक जाधव)
27 / 27
रखडलेल्या शिवाजी पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ‘सीपीआर’च्या आवारात संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली व त्यांना रोखून धरले. (दीपक जाधव)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात