All Lingayat Samaj's huge rally in Kolhapur
समस्त लिंगायत समाजाचा कोल्हापुरात प्रचंड मोर्चा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 5:56 PM1 / 8कोल्हापूर : ‘होय, आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरिता तन-मन-धन लावून लढेन; एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन,’ अशा एकसुरात, तळपत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेत स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता समस्त लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. (छाया : आदित्य वेल्हाळ)2 / 8कोल्हापूर : ‘होय, आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरिता तन-मन-धन लावून लढेन; एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन,’ अशा एकसुरात, तळपत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेत स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता समस्त लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. (छाया : आदित्य वेल्हाळ)3 / 8शाहू छत्रपती, कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांनीही काही वेळ मोर्चात सहभागी होऊन आपला पाठींबा दिला. दुपारी दीड वाजता सभेची सांगता होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला.4 / 8 लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी आणि अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाज समितीच्यावतीने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. या मोर्चात लिंगायत समाज बांधव सहकुटुंब, सहपरिवार प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ) 5 / 8कोल्हापूर : अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला शिरोमणी अकाली दलानेही पाठिंबा दिला आहे. या समाजाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह तेराजण कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी या महामोर्चात आपल्या सहकाऱ्यांसह महामोर्चाच्या ठिकाणी दसरा चौकात ठिय्या मांडला आहे.6 / 8कोल्हापूर : बसवेश्वरांच्या छायाचित्रासह लहरणारे भगवे झेंडे, ‘मी लिंगायत, लिंगायत स्वतंत्र धर्म’ लिहिलेल्या आणि डोक्यावर परिधान केलेल्या टोप्या, गळ्यात घालण्यात आलेले भगवे स्कार्फ ‘जगनज्योती महात्मा बसवेश्वर की जय,’ ‘मी लिंगायत, आमचा धर्म लिंगायत’च्या घोषणा, लाखो शरण-शरणींची उपस्थिती आणि ‘भारत देशा, जय बसवेशा’चा गजर असे अनोखे वातावरण रविवारी दसरा चौकाने अनुभवले.7 / 8मोठ्या संख्येने लिंगायत महिला आणि पुरुष या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरला होता. त्यामुळे सर्व वयोगटांतील सर्वांनीच या मोर्चाची आठवण राहावी यासाठी फोटो तसेच सेल्फी काढून घेतले.8 / 8मोठ्या संख्येने लिंगायत महिला आणि पुरुष या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरला होता. त्यामुळे सर्व वयोगटांतील सर्वांनीच या मोर्चाची आठवण राहावी यासाठी फोटो तसेच सेल्फी काढून घेतले. आणखी वाचा Subscribe to Notifications